आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 30 Injured In Odisha I Kartikeshwar Immersion Procession Incident I Latest News 

ओडिशात विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना:केंद्रपाड्यात फटाक्यांची आतषबाजी स्पर्धेत स्फोट, 30 हून अधिक लोक गंभीर जखमी

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशाच्या बलिया बाजारात बुधवारी भगवान कार्तिकेश्वराच्या विसर्जनाच्या वेळी फटाके फोडण्याच्या स्पर्धेत स्फोट झाला. यात सुमारे 30 जण भाजले गेले. प्रत्यक्षात येथे फटाके फोडण्याची स्पर्धा स्पर्धा घेण्यात येत होती. फटाके फोडण्याची स्पर्धा सुरू असताना फटाक्यांच्या ढिगाऱ्यावर ठिणगी पडल्याने स्फोट झाला. ​​​​​​

ओडिशातील केंद्रपाडा येथील बलिया बाजारात विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाक्यांच्या स्पर्धेदरम्यान मोठी आग लागली. या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. केंद्रपाडा येथील सदर पोलिस ठाण्याच्या बलिया बाजारातस विसर्जन मिरवणुकीत अनेक लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्य़ात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत झालेल्या स्फोटात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

या वृत्तबाबत वृतसंस्था एनएनआयने ट्विट केले आहे.
या वृत्तबाबत वृतसंस्था एनएनआयने ट्विट केले आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल : जिल्हाधिकारी
केंद्रपाडा जिल्हाधिकारी अमृत ऋतूराज यांनी सांगितले की, केंद्रपारा येथील सदर पोलीस स्टेशनच्या बलिया मार्केटमध्ये विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्फोटांमध्ये 30 हून अधिक लोक जखमी झाले. ते म्हणाले की, सर्व जखमींना केंद्रपारा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी ओडिशात मालगाडीचा अपघात
दरम्यान, या घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच ओडिशातील जाजपूर कोराई रेल्वे स्टेशनवर 21 नोव्हेंबरला ​​​​​​ एक अनियंत्रित मालगाडी रुळावरून घसरली होती. मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आरपीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यात कामाला लागले. त्याचवेळी भुवनेश्वरहून अपघातग्रस्त मदत गाडी घटनास्थळी पाठवण्यात आले होते. त्यावेळी तत्काळ बचावकार्य करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...