आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 30 September 2021 Last Date To Update Demat Account KYC, Old Cheque Books And More; News And Live Updates

कामाची गोष्ट:नवीन चेकबुक, बँक खात्याचे मोबाईल नंबर अपडेट यासह ही 4 कामे आजच निपटून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज 30 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यातील शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे ही अनेक महत्वाची कामे मार्गी लावण्याची शेवटची तारीख आहे. बँक खात्यात मोबाईल नंबर अपडेट करणे, डीमॅट खात्याचे केवायसी करणे यासह काही महत्वाचे काम आजच निपटून घ्या. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अशा कोणत्या चार गोष्टी आहेत जे तुम्हाला आजच करायच्या आहेत.

बँक खात्यात योग्य मोबाईल नंबर अपडेट करणे
देशात 1 ऑक्टोबरपासून नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम लागू होणार आहे. ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, एलआयसी किंवा इतर कोणतेही खर्च ठेवले असतील, तर एका विशिष्ट तारखेला बँक खात्यातून ते पैसे आपोआप कापले जातील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत, जर तुमचा नंबर अपडेट नसेल तर 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे आजच अपडेट करुन घ्या.

नवीन सिस्टीम अंतर्गत बँकांना पेमेंट देय तारखेच्या 5 दिवस आधी ग्राहकांच्या मोबाइलवर अधिसूचना पाठवावी लागेल. अधिसूचनेला ग्राहकांची मान्यता असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे 5000 पेक्षा जास्त रक्कम भरल्यावर ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेत तुमचा योग्य मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

अलाहाबाद, OBC आणि युनायटेड बँकेचे ग्राहक नवीन चेकबुक घेऊ शकतात
1 ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँकेची जुनी चेकबुक निरुपयोगी होतील. म्हणून, तुम्हाला पुढे कोणतीही अडचण येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही आजच नवीन चेकबुक घेऊन घ्या. ओबीसी आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये (पीएनबी) विलीन झाले आहेत. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन करण्यात आली आहे.

डीमॅट खात्याचे केवायसी
बाजार नियामक सेबीने (SEBI) नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट खाती उघडण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानुसार, जर तुमच्याकडे डीमॅट खाते असेल, तर तुम्हाला ते 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावे लागेल. जर डीमॅट खात्याचे केवायसी केले नाही तर तुमचे डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. यामुळे तुम्हाला शेअर बाजारात व्यापार करता येणार नाही. जरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. विशेष म्हणजे केवायसी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच हे करता येणार आहे.

कर्जासाठी अर्ज करा
पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) 30 सप्टेंबरपर्यंत गृहकर्जावर प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. पीएनबी बँक 6.80% व्याज दराने गृहकर्ज देत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पीएनबी कडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आज या ऑफरचा लाभ घेण्याची तुमची शेवटची संधी आहे. पीएनबी गृहकर्जावर 0.50% प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क आकारते.

बातम्या आणखी आहेत...