आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनचा परिणाम:35 टक्के एमएसएमई बंद, 37% स्वयंरोजगार गमावले

दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकसान भरपाईसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सक्षम नाहीत

लॉकडाऊनमुळे लघु उद्योगांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे ३५ टक्के सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) बंद झाले असून ३७ टक्के स्वयंरोजगार गमावले आहेत. ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (एआयएमओ) केलेल्या सर्वेक्षणात हा खुलासा करण्यात आला.

एआयएमओच्या अहवालानुसार, कोरोना संकटामुळे लघु उद्योगांचे पैसे बाजारात अडकले आहेत. आता त्यांच्याकडील कार्यकारी भांडवलही संपले आहे. तसेच, सरकारचे आर्थिक पॅकेजही पोहोचलेले नाही. पॅकेजची काही रक्कम प्राप्त झाल्यानंतरही लॉकडाऊन दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई करणे पुरेसे नाही. अशा परिस्थितीत बहुतेक छोटे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत.एआयएमओचे महासचिव केनी रामानंद म्हणाले की, या क्षेत्रात बरीच कामे यापुढे दिसणार नाहीत. तसेच, बऱ्याच लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. ते म्हणाले, या सर्वेक्षणात ४६००० प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यापैकी केवळ ३२ टक्के लोकांनी येत्या सहा महिन्यांत सद्यपरिस्थितीवर मात करता येईल, असे सांगितले. तर तीन महिन्यांत सुधारणा होईल, असे १२ टक्के लोकांनी सांगितले. एआयएमओनुसार, भारतात ६.५ कोटी एमएसएमई असून या माध्यमातून १५ कोटी लोकांना रोजगार मिळतो. तसेच, १३ टक्के लोक स्वयंरोजगार कमावतात.

बातम्या आणखी आहेत...