आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टाळेबंदीमुळे गेल्या २ महिन्यांत भले आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या आहेत, मात्र भारतीयांमध्ये सोन्याबाबतची आत्मीयता कमी झालेली नाही. वर्ल्ड गोल्ड काैन्सिल(डब्ल्यूजीसी)च्या एका पाहणीनुसार देशात सोन्याच्या दागिन्यांची किरकोळ मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. या पाहणीत डब्ल्यूजीसीने २,२८५ जणांची मते नोंदवली. यामध्ये १,००५ ग्रामीण आणि १,२८० शहरी लोक आहेत. यापैकी जवळपास ३७% भारतीय महिला ज्यांनी आधी कधी सोने खरेदी केले नव्हते, त्यांनी आगामी काळात खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये ४४% महिला ग्रामीण भागांतील होत्या. ३०% महिला शहरी भागांतील होत्या. सोने दागिने उद्योगासाठी व्यवसायाच्या दृष्टीने संभाव्य ग्राहकांचा हा एक चांगला आकार म्हणू शकतो.
“रिटेल गोल्ड इनसाइट्स : इंडिया ज्वेलरी’ नावाच्या या अहवालात हेही नमूद केले की, ६०% भारतीय महिलांकडे आधीपासूनच सोन्याचे दागिने आहेत. ५२% भारतीय गुंतवणूकदरांकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोने आहे. फॅशन आणि लाइफस्टाइलसाठी शॉपिंग करणाऱ्यांमध्ये सोने दुसरी लोकप्रिय वस्तू आहे. केवळ डिझायनर कपडे आणि सिल्क साडीच यात पुढे आहे. वर्ल्ड गोल्ड काैन्सिल(इंडिया)चे एमडी सोमसुंदरम पी.आर. म्हणाले, भारताची सराफा बाजारपेठ येथील उत्कृष्ट कारागिरांमुळे जगभरात पुढे आहे.
बहुतांश तरुण महिला सोन्याच्या दागिन्यांचे सक्रिय ग्राहक
पाहणीत ही बाब समोर आली की, शहरी महिलांमध्ये सोन्याच्या सुरक्षेबाबत जास्त भर दिसला. ग्रामीण महिलांनी सांगितले, सोन्याची स्वीकार्हता जगजाहीर आहे. त्या पारंपरिक रूपातील सोने पसंत करतात. अहवालानुसार, बहुतांश तरुण महिला सोन्याच्या दागिन्याच्या सक्रिय ग्राहक आहेत. १८-२४ वर्षांच्या ३३% महिला, विशेषत: शहरी महिलांनी सांगितले की, त्यांनी गेल्या १२ महिन्यांत सोने खरेदी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोने टिकाऊ असण्यासोबत आणि गुंतवणुकीसाठी एक चांगले माध्यम आहे. या कारणास्तव सोन्याची खरेदी पसंत करतात.
सुमारे ४०% लोकांनी सांगितले - त्यांनी गेल्या १२ महिन्यांत सोने खरेदी केली
मुंबईच्या सराफा बाजारात बुधवारी दागिन्यांचे सोन्या(२२ कॅरेट)ची किंमत ४६७ रु. कमी होऊन ४२,४३२ रु. प्रति १० ग्रॅम राहिली. याआधी शुक्रवारी सोन्यात २७६ रुपयांची घट आली आणि भाव ४२,८९९ रु. प्रति १० ग्रॅम राहिला होता. या दोन दिवसांत सोने प्रति १० ग्रॅम ७४३ रुपये स्वस्त झाले होते. मुंबईत बुधवारी शुद्ध सोन्याची किंमत ५०९ रु. कमी होऊन ४६,२९० रुपये प्रति १० ग्रॅम राहिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.