आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग शिफ्ट:म्युच्युअल फंडामध्ये प्रथमच 40 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्युच्युअल फंडांवरील गुंतवणुकदारांचा विश्वास वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये प्रथमच म्युच्युअल फंड उद्योगाच्या अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयुएम) ने ४० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत इक्विटी फंडातील गुंतवणूक ७६% कमी झाली. प्रॉफिट बुकींग हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (एएमएफआय) नुसार, म्युच्युअल फंड उद्योगाची एयूएम नोव्हेंबरमध्ये ४०.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. ऑक्टोबरमध्ये ते ३९.५० लाख कोटी रुपये होते.

एसआयपी गुंतवणूक उच्चांकी पातळीवर शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे गुंतवणूक गेल्या महिन्यात १३,३०७ कोटींच्या नवीन उच्चांकावर पोहोचली होती. एसआयपी गुंतवणूक ऑक्टोबरमध्ये प्रथमच १३,००० हजार कोटी (रु. १३,०४०.६४ कोटी) ओलांडली.

किरकोळ विक्रेत्यांनी नफा केला वसूल ^म्युच्युअल फंडाच्या काही योजना हटवण्यात आल्या. किरकोळ गुंतवणुकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगचा हा परिणाम आहे. सण-उत्सवांनंतर लग्नसराईची खास खरेदी व आवश्यक खर्च हे यामागचे कारण असू शकते. एनएस वेंकटेश, सीईओ, एम्फी

इक्विटीमधून पैसा डेट फंडात एम्फीच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये कर्ज योजनांत ३,६६८.५९ कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली.त्यातुलनेत ऑक्टोबरमध्ये या श्रेणीतील म्युच्युअल फंडातून २,८१८ कोटी रुपये काढले गेले.

बातम्या आणखी आहेत...