आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतपे ने कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी आणि माजी नियंत्रक प्रमुख माधुरी जैन यांच्याविरुद्ध कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिंटने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वृत्तानुसार, या प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतपेच्या बोर्डाने अशनीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी या दोघांनाही निधीचा गैरवापर केल्याबद्दल काढून टाकल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
80 कोटींहून अधिकची फसवणूक
मिंटच्या अहवालात या प्रकरणाशी संबंधितअसलेल्या एका व्यक्तीचा हवाला देऊन म्हटले आहे की, भारतपेच्या बोर्डाची चौकशी आता पूर्ण झाली आहे. ऑडिट झाले असून संपूर्ण अहवाल तयार आहे. अहवालाच्या आधारे, भारतपेने 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 420 फसवणुकीशी संबंधित आहे. गुन्ह्यासाठी कमाल शिक्षा 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड आहे.
ग्रोव्हर यांचा SIAC कडून पराभव
याआधी ग्रोव्हरने सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) मध्ये केस दाखल केली होती. ग्रोव्हरने दावा केला होता की, भारतपेची आपल्याविरुद्धची चौकशी बेकायदेशीर आहे. ग्रोव्हर यांची बाजू करंजावाला अँड कंपनीने, तर भारतपे यांची बाजू ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी मांडली होती. SIAC च्या निकालानंतर दहा दिवसांनी, ग्रोव्हर यांना भारतपे मधील सर्व पदांवरून काढून टाकण्यात आले.
नववर्षाच्या सुरुवातील व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमूळे ग्रोव्हर अडचणीत
यावर्षाच्या सुरुवातीला एक ऑडिओ क्लिप समोर आली होता. त्या क्लिपमध्ये ग्रोव्हर कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्यासोबत अपमानजनक भाष्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण इतके चिघळले की, ग्रोव्हर यांना कंपनीच्या एमडी पदावरुन हटावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.