आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील श्रीमंत व्‍यक्‍ती:सर्वोच्च श्रीमंतांच्या यादीत 43 रिअल इस्टेट डेव्हलपर, गौतम अदानी टॉपवर

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या सर्वोच्च श्रीमंतांच्या यादीत या वर्षी ४३ रिअल इस्टेट विकासकांनीदेखील जागा बनवली. ‘आयआयएफएल वेल्थ हुरुण इंडिया रिच लिस्ट २०२२’ मध्ये १०.९४ लाख काेटींच्या संपत्तीसह गौतम अदानी टॉपवर आणि ७.९५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिले. हुरुणच्या ताज्या यादीनुसार डीएलएफचे राजीव सिंह आणि त्यांचे कुटुंब ६१,३०० कोटी रुपयाच्या संपत्तीसह रिअल इस्टेट विकसकांमध्ये अव्वल आहे. भारतीय श्रीमंतांच्या यादीत ते १७व्या क्रमांकावर आहे. चंद्रू रहेजा हे ४७,२०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह देशातील दुसरे सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. देशाच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक २८वा आहे. या यादीनुसार मंगल प्रभात ४५,९०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे सर्वात श्रीमंत विकासक. ३७,१०० कोटी रुपयांच्या संपत्ती निरंजन हिरानंदानी या प्रकरणात चौथ्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...