आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 4,400 Crores To Be Given To ECGC To Promote Exports, NEIA Trust To Get 1,650 Crores For Project Finance Insurance; News And Live Updates

​​​​​​​मंत्रिमंडळाची बैठक:'मध्यान्ह भोजनाचे' नाव आता पंतप्रधान पोषण योजना; दोन हजार कोटींसह दोन रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण केले जाईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 59 लाख नवीन रोजगार निर्माण होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दरम्यान, या बैठकीमध्ये शिक्षण, पायाभूत सुविधा आणि परदेशी व्यापाराबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. परंतु, यामधील महत्वाच्या तीन निर्णयांचा उल्लेख करता येईल. प्रथम- दोन रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, दुसरे- निर्यात वाढवण्यासाठी उपाय आणि तिसरा- मध्यान्ह भोजनाऐवजी प्रधानमंत्री पोषण योजना.

'मध्यान्ह भोजन' ऐवजी 'पीएम पोषण'
मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी 'पीएम पोषण' योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना 'मध्यान्ह भोजन' या योजने ऐवजी लागू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 11.2 लाखांहून अधिक सरकारी शाळांमधील मुलांना दिवसासाठी मोफत अन्न मिळेल. सरकारने 'पीएम पोषण' योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांत 1.31 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने ही योजना चालवणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

'अंगणवाडी'च्या मुलांना या योजनेचा मिळणार लाभ
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मते, अंगणवाडीमध्ये येणाऱ्या 1-5 वर्षांच्या मुलांना देखील पीएम पोषण मिळेल. या योजनेसाठी स्थानिक पातळीवर पिकवलेले पौष्टिक अन्न धान्य शाळांमध्ये उपलब्ध केले जाईल असे ते म्हणाले.

नीमच-रतलाम रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण
ठाकूर म्हणाले की, नीमच-रतलाम रेल्वे लाईन 1,096 कोटीच्या गुंतवणुकीसह दुहेरी मार्गात बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट-कनालुस रेल्वे ट्रॅक देखील दुप्पट केला जाईल. केंद्र सरकार या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 1,080 कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही ते म्हणाले.

ECGC ला 5 वर्षात 4,400 कोटी मिळतील
या बैठकीमध्ये निर्यातीला चालना देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याअंतर्गत, सरकार पुढील पाच वर्षांत निर्यात क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला (ईसीजीसी) 4,400 कोटी रुपयांचे भांडवल देणार आहे.

59 लाख नवीन रोजगार निर्माण होतील
सरकारच्या मते, ईसीजीसीला भांडवल उपलब्ध करुन दिल्याने पुढील पाच वर्षांत 5.28 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला चालना मिळणार आहे. यामुळे 59 लाख नवीन रोजगार निर्माण होणार असून त्यापैकी 2.6 लाख औपचारिक क्षेत्रात निर्माण होतील असे सरकारने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...