आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation Rises In 5 Months, Construction Of 4.8 Lakh Houses Stalled In 7 Major Cities

महागाई वाढीने घरांचे बांधकामही थांबले:5 महिन्यांत महागाईत वाढ, 7 मोठ्या शहरांमध्ये 4.8 लाख घरांचे बांधकाम रखडले

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये 4.48 लाख कोटी रुपयांच्या सुमारे 4.8 लाख कोटी घरांचे बांधकाम सध्या रखडले आहे. मे 2022 अखेरीस, या सात शहरांमध्ये 4,48,129 कोटी रुपयांची 4,79,940 घरे बांधकामाच्या विविध टप्प्यांमध्ये अडकली होती. तर, कॅलेंडर वर्ष 2021 च्या अखेरीस, 4.84 लाख कोटी रुपयांच्या सुमारे 5,16,770 घरांचे बांधकाम अनेक टप्प्यांत अडकले होते. यावर्षी जानेवारी ते मे 2022 दरम्यान, या शहरांमध्ये 36,830 संथ गतीने चालणाऱ्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

गेल्या 5 महिन्यांत खर्चात झपाट्याने वाढ

प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म अ‍ॅनारॉकच्या संशोधन अहवालातून ही माहिती समोर आली आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर), कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांचा समावेश आहे. अ‍ॅनारॉकचे वरिष्ठ संचालक प्रशांत ठाकूर म्हणाले की, “विकासक त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. रेडी-टू-मूव्ह घरांच्या सततच्या मागणीचा फायदा घेत गेल्या पाच महिन्यांत खर्चात झपाट्याने वाढ झाली आहे. असे असतानाही बांधकाम व्यावसायिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामाचा वेग कायम ठेवत आहेत.

रखडलेली 77% घरे दिल्ली-एनसीआरमधील

अ‍ॅनारॉकच्या अहवालानुसार, देशातील 7 प्रमुख शहरांमधील एकूण अडकलेल्या/विलंब झालेल्या घरांपैकी 77% घरे दिल्ली-एनसीआर आणि एमएमआर आहेत. तर दक्षिणेकडील महानगरे बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये फक्त 9% आहेत. पुण्यातील सुमारे 9% घरांचा तर कोलकाता मधील 5% घरांचा यात समावेश आहे.

सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये 1,81,410 कोटी रुपयांच्या 2,40,610 घरांचे बांधकाम अडकले आहे. त्याच वेळी, एमएमआरमध्ये 1,84,226 कोटी रुपयांच्या 1,28,870 घरांच्या बांधकामाला विलंब होत आहे.

बातम्या आणखी आहेत...