आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • 5 Lakh New Jobs After Lockdown, 18 Industries Increase Recruitment, 4.24% More Jobs In October

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकऱ्यांबाबत सकारात्मक वृत्तांत:लॉकडाऊननंतर 5 लाखांवर नव्या नोकऱ्या, 18 उद्योगांत भरती वाढली, ऑक्टोबरमध्ये 4.24% जास्त नोकऱ्या

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाला दिलासा देणाऱ्या दोन बातम्या

जगभरात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि वेतनावर वाईट परिणाम झाला. पण आता देशात नोकऱ्या पुन्हा मिळत आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ताज्या आकड्यांनुसार मे ते ऑक्टोबरदरम्यान ५,२६,३८९ लोकांना विविध क्षेत्रांत नोकऱ्या मिळाल्या. चांगली बाब म्हणजे वार्षिक आधारावर पाहिले तरही गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४.२४ % जास्त लोकांना नव्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. एवढेच नाही तर यादरम्यान ४.९० लाख लोकांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. म्हणजे वेगवेगळ्या कारणांममुळे ज्यांची नोकरी गेली होती, त्यांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. वार्षिक आधारावर गेल्या वर्षाच्या ऑक्टोबरच्या तुलनेत हा आकडा २३ % जास्त आहे. त्यात ईएसआयसीचे कर्मचारी मिळवले तर हा आकडा आणखी वाढेल.

३५०० पेक्षा जास्त कंपन्यांसाठी एचआर सोल्युशन देणाऱ्या टीम लीसचे प्रमुख (स्टाफिंग बीएफएसआय अँड कंझ्युमर बिझनेस) अमित वडेरा यांनी सांगितले की, आगामी ५-६ महिने असाच ट्रेंड राहील, म्हणजे नोकऱ्या वाढतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच विविध उद्योगांत नियुक्त्या वाढणे सुरू झाले होते. लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स भरती करत होते. आता बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातही भरतीची गती वाढली आहे. कोरोनाबाबत जसजशी लोकांची माहिती वाढत आहे आणि लस येण्याची शक्यता वाढत आहे तसेतसे कंपन्यांनी आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. मार्केट रिकव्हर होत आहे. त्यामुळे संस्था आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांच्या भरतीस प्राधान्य देत आहेत. कारण अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज भासत नाही. दुसरीकडे, प्रोफेशनल्सना जोडणाऱ्या लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार, २०१२ मध्ये नव्या नोकऱ्या वाढतील, अशी ४०% प्रोफेशनल्सना अपेक्षा आहे. ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म एऑनच्या सॅलरी ट्रेंड सर्वेक्षणानुसार, ८७% भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्याच्या तयारीत आहेत. करीअरनेट टेक्नॉलॉजीजच्या एका ताज्या सर्वेक्षणानुसार, जानेवारी २०२१ नंतर हायरिंगची प्रक्रिया सामान्य होईल आणि नोकऱ्या वाढतील, अशी अपेक्षा ५०←% पेक्षा जास्त कंपन्यांना आहे.

काही राज्यांत सुखद स्थिती
1) यूपी : कोरोनाकाळात सर्वाधिक नोकऱ्या दिल्या

उत्तर प्रदेश सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी सांगितले की, बँक डेटानुसार ६ लाख ८० हजार नव्या एमएसएमईला कर्ज देण्यात आले, त्यामुळे २४ लाख रोजगार मिळाले. ८० हजारांवर सरकारी नोकऱ्याही दिल्या. कोरोनाच्या काळात नोकरी देण्यात यूपी सरकार सर्वात पुढे आहे.

2) राजस्थान : २५ हजार पेक्षा जास्त नोकऱ्या दिल्या
राजस्थानमध्ये कोरोना काळात मार्च ते डिसेंबरपर्यंतच्या काळात २५,३८६ पदांवर सरकारने नियुक्ती दिली. त्यात सर्वाधिक ११,३२२ पदांवर एलडीसी भरती झाली आहे. दुसरीकडे याचदरम्यान सरकारने ६,६५७ पदांवर नवी भरतीही सुरू केली आहे.

3) हरियाणा : ९४०० पेक्षा जास्त पदांवर केली भरती
हरियाणा पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ९४०० पेक्षा जास्त पदांवर आधीपासून सुरू असलेली भरती पूर्ण करण्यात आली आहे. त्यात ग्रुप-सी आणि डी श्रेणीच्या ९१०६ पदांवर एचपीएससी आणि ग्रुप-बी व ए श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या ३०० पेक्षा जास्त पदांवर भरती केली.

4) बिहार : पुढील वर्षी एक लाखावर नियुक्त्या
कोरोना काळात ५ हजार नर्स, १००० डॉक्टरची नियुक्ती झाली. तथापि, ही प्रक्रिया आधीपासून सुरू होती. ८००० शिपायांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. २०२१ मध्ये ९१,७६३ प्राथमिक शिक्षक, ३३ हजार माध्यमिक शिक्षकांसहित १ लाख नियुक्त्या होतील.

देशाला दिलासा देणाऱ्या दोन बातम्या
- नोकरी डॉट कॉमने अलीकडेच ‘हायरिंग अॅक्टिव्हिटी इन इंडिया’ अहवाल जारी केला. त्यानुसार १९ प्रमुख उद्योगांपैकी १८ मध्ये एप्रिलच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जास्त भरती झाली आहे.
- प्रायव्हेट रिसर्च फर्म सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनुसार, कोरोनामुळे एप्रिलचा बेरोजगारी दर २३.५% वर गेला होता, तो ऑक्टोबरमध्ये घटून ६.९८% झाला. तो कोविड-पूर्व स्तराजवळ आहे.

सध्याची स्थिती - अॉक्टोबरमध्ये बेरोजगारी दर कोविड-पूर्व स्तरावर गेला. देश कोरोनाच्या परिणामांतून बाहेर पडत आहे, सरकारी व खासगी क्षेत्रांत नोकऱ्यांत वाढ
परिणाम - देशात नोकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मकता राहील. लिंक्डइननुसार २०२१ मध्ये नव्या नोकऱ्या वाढतील.

40 टक्के प्रोफेशनल्सना अपेक्षा आहे की, २०२१ मध्ये नव्या नोकऱ्या वाढतील.

बातम्या आणखी आहेत...