आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 50% Of Candidates Fail The Interview Due To Lack Of Information About The Company

जॉब कोच:कंपनीबाबत माहिती न घेतल्याने 50% उमेदवार मुलाखतीतून होतात बाहेर

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्रूटमेंट एजन्सी लीगल जॉब्सनुसार एका पदासाठी सरासरी ११८ उमेदवार अर्ज करतात. त्यातील केवळ २० टक्के लोकांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम निवडीवेळी मुलाखतीत तुमच्याद्वारे देण्यात येणाऱ्या उत्तरांची भूमिका महत्त्वाची असते. जवळपास सर्व जॉब इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न सारखे असतात. जसे की तुम्हाला किती वेतन हवे? किंवा तुम्हाला कोणत्या वातावरणात काम करायला आवडेल? हे प्रश्न साधारण तर असतात, मात्र त्याची परिणामकारक उत्तरे तुमची निवड निश्चित करतात. वेतनासंबंधित प्रश्नांसाठी लिंक्डइन, ग्लासडोरसारख्या पोर्टलची मदत घ्या. आपली योग्यता व अनुभवानुसार किती वेतन मिळते, याचा शोध घ्या. त्यानुसार रिक्रूटर्सना उत्तरे द्या. कामाच्या वातावरणासंदर्भात बोलताना सांगू शकता की, जेथे वेगाने काम होते ते वातावरण आवडते. त्यातून शिकण्याची, पुढे जाण्याची शक्यता वाढते.

७१% उमेदवार ड्रेस कोड फॉलो करत नाहीत जॉब इंटरव्ह्यू स्टॅटिस्टिक्सनुसार कंपनीबाबत माहिती नसल्याने ५० टक्के उमेदवार मुलाखतीतून बाहेर होतात. त्यामुळे मुलाखतीच्या आधी कंपनीच्या कामाच्या पूर्ण पद्धतीबाबत जाणून घ्या. शोध घ्या. त्याशिवाय ७१ टक्के कंपन्या ड्रेस कोड न फॉलो करणाऱ्या उमेदवारांची निवड करत नाहीत, हेही कायम लक्षात असू द्या.

बातम्या आणखी आहेत...