आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आधीच मंदीशी झगडणाऱ्या वाहन क्षेत्रास कोरोना विषाणूने मोठा झटका दिला आहे. मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन्यांच्या विक्रीत विक्रमी ५१% घसरण आली आहे. मार्च २०१९ मध्ये २.९१ लाख गाड्यांची विक्री झाली होती. मार्च २०२० मध्ये ही संख्या घटून १.४३ लाख गाड्यांवर राहिली. यामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांना दररोज २३०० कोटी रुपयांच्या उत्पादनाचे नुकसान होत आहे. सोसायटी आॅफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स(सियाम)ने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. सियामच्या अहवालानुसार, वाहन उद्योगाने मार्च २०२० मध्ये प्रवासी वाहन, व्यावसायिक वाहन, तीनचाकी, दुचाकी आणि चारचाकीसह एकूण १४.४७ लाख वाहनांचे उत्पादन केले. गेल्या वर्षी या अवधीत २१.८० लाख गाड्यांची निर्मिती झाली होती. म्हणजे, ३३.६१% घसरण आली. एसआयएएमचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, उद्योग आधीपासूनच गंभीर घसरणीच्या संकटात आहे. पुरवठा ठप्प आहे. कोरोना विषाणू संकटामुळे कंपन्यांनीही मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद करण्याची घोषणा केली.
१३००० व्यावसा. वाहनांची निर्मिती
व्यावसायिक वाहनांची विक्री मार्च २०२० मध्ये ८८.०५% घटली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१९ मध्ये १.०९ वाहनांची निर्मिती झाली होती. या मार्चमध्ये १३,०२७ गाड्या तयार झाल्या. यानंतर तीनचाकीत दुसरी मोठी घसरण नोंदली आहे. मार्च २०२० मध्ये तीनचाकीची विक्री ५८.३४% घटून २७,६०८ राहिली. मार्च २०१९ मध्ये विक्री ६६,२७४ वाहने होती. याच पद्धतीने मार्च २०२० मध्ये दुचाकी वाहनांची विक्रीही ३९.८३% घटून ८.६६ लाख युनिट राहिली. मार्च २०१९ मध्ये १४.४० लाख युनिटची निर्मिती झाली होती.
आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १८ %घसरण
सियामच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये एकूण वाहनांच्या विक्रीत १८ टक्के घसरण नोंदली आहे. उत्पादनही १५ टक्के घटून २६,३६२,२८४ युनिट राहिले. प्रवासी वाहनांची विक्री १७.८२ टक्के घटून २,७७५,६७९ युनिट राहिली. व्यावसायिक वाहनांची विक्री २८.७५ टक्के घटून ७१७,६८८ युनिट राहिली. तीनचाकी वाहनांची विक्री ७०१,००५ युनिटच्या तुलनेत ६३६,५६९ युनिट राहिली. यात ९ टक्के घसरण राहिली. या पद्धतीने दुचाकी वाहनांची विक्री १७.७६ टक्के घटून १७,४१७,६१६ युनिट राहिली.
खोळंबलेली विक्री सुरू करण्यासाठी आता टाटाही ऑनलाइन विक्री करणार
ह्युंदाईनंतर आता टाटा मोटार्सने प्रवासी वाहनांच्या विक्रीसाठी सोमवारी ऑनलाइन मंच क्लिक टू ड्राइव्ह सादर केले. या मंचावर ग्राहकांना कंपनीचे प्रवासी वाहन खरेदीशी जोडलेल्या पूर्ण डिजिटल विक्रीचा अनुभव(एंड टू एंड एक्सपिरियन्स) मिळेल. कंपनीच्या निवेदनानुसार, या मंचावर कंपनीच्या देशभरातील ७५० हून अधिक आऊटलेट जोडलेले असतील. या मंचावरून ऑर्डर केल्यास ग्राहकांना वाहनाची घरी डिलिव्हरी दिली जाईल. ग्राहक क्लिक टू ड्राइव्ह मंचावर नोंदणी करून टाटा मोटार्सच्या पोर्टफोलिओतून आवडीचे वाहन बुक करू शकतील.
टाळेबंदीतही कंपन्यांकडून नवे मॉडेल लाँच
वाहन कंपन्यांनी बीएस६ मानकाच्या आपल्या मॉडेल्सची लाँचिंग सुरू ठेवली आहे. कंपन्यांनुसार, टाळेबंदी संपल्यानंतर विक्री सुरू होईल. अशा स्थितीत प्री बुकिंगसाठी लाँचिंग केली जात आहे. ह्युंदाईने नवी व्हर्ना बीएस६ लाँच केली आहे. तिची एक्स शोरूम किंमत ९,३०,५८५ रु. ठेवली आहे. एवढेच नव्हे तर ह्युंदाईने ग्रँड आय १० नियोसचे सीएनजी व्हर्जनही लाँच केले आहे.
टाळेबंदीमुळे मार्च वाहन क्षेत्रासाठी सर्वात आव्हानात्मक महिन्यापैकी एक होता. महसुलावर गंभीर परिणाम झाला आहे. चालू भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंपन्या संघर्ष करत आहेत. - राजेश मेनन, महासंचालक, एसआयएएम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.