आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत घट:2 महिन्यांत 54.77 लाख लोक मोबाइलपासून दूर, जिओ पहिल्या क्रमांकावर कायम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या दोन महिन्यांत 54.77 लाख लोक मोबाइलपासून दुरावले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या मते, ऑक्टोबर 2022 मध्ये देशभरातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या 114.36 कोटी झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यात सुमारे 114.91 कोटी मोबाइल वापरकर्ते होते. सप्टेंबर महिन्यात मोबाइल वापरकर्त्यांची संख्या 36.64 लाखांनी घटून 114.54 कोटी झाली आहे. त्याच वेळी ऑक्टोबर महिन्यात 18.13 लाख मोबाइल वापरकर्ते कमी झाले आहेत.

14.14 लाख युझर्स जिओला, तर 8.05 लाख युझर्स एअरटेलला जॉईन

रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात आपले वर्चस्व कायम राखले आहे आणि पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑक्टोबरमध्ये जिओने आपल्या नेटवर्कमध्ये 14.14 लाख नवीन युझर्स जोडले आहेत. यासह, जिओ नेटवर्कच्या युझर्सची संख्या 42.13 कोटी झाली आहे. त्याच वेळी ऑक्टोबरमध्ये भारती एअरटेलमध्ये 8.5 लाख नवीन युझर्स जोडले गेले. यानंतर एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 36.50 कोटी झाली आहे.

व्होडाफोन-आयडियाचे युझर्स घटले

व्होडाफोन आयडियाचे वापरकर्ते सातत्याने कमी होत आहेत. व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या 35.09 लाख वापरकर्त्यांनी ऑक्टोबरमध्ये नेटवर्क सोडले आहे. यासह कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 24.56 कोटींवर आली आहे. बीएसएनएलचे 5.92 लाख वापरकर्ते कमी झाले आहेत. यामुळे त्याच्या वापरकर्त्यांची संख्या 10.86 लाखांवर आली आहे.

जिओचा 36.85% मार्केट शेअर

TRAI च्या मते, दूरसंचार बाजारात रिलायन्स जिओचा बाजार हिस्सा 36.66% वरून 36.85% झाला आहे, तर भारती एअरटेलचा बाजार हिस्सा 31.80% वरून 31.92% पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, व्होडाफोन-आयडियाचा स्टेक सप्टेंबरपर्यंत 21.75 वरून 21.48% वर आला आहे.

देशात 5Gचे 20,980 बेस स्टेशन स्थापित

5G सेवेबद्दल बोलायचे झाले तर, 26 नोव्हेंबरपर्यंत देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20,980 बेस स्टेशन्स बसवण्यात आले आहेत. शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दळणवळण राज्यमंत्री देवू सिंह चौहान यांनी सांगितले की, देशात दर आठवड्याला सुमारे 2500 नवीन 5G टॉवर बसवले जात आहेत.

दिल्लीत 5G टॉवर सर्वाधिक 5829

एअरटेलने दिल्लीत 938 5G टॉवर स्थापित केले आहेत, तर रिलायन्स जिओने 4891 टॉवर्स स्थापित केले आहेत. आयडिया-वोडाफोनने दिल्लीत 5G सेवांसाठी अद्याप एकही टॉवर स्थापित केलेला नाही. दिल्लीनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक टॉवर आहेत. महाराष्ट्रात 4051 5G टॉवर बसवले आहेत. अशा परिस्थितीत एअरटेल आणि रिलायन्स जिओचे ग्राहक वाढतील.

बातम्या आणखी आहेत...