आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:55 टक्के भारतीय कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जास्त बचत करू इच्छितात : सर्व्हे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पे निअरबाय कंपनीने केले कोरोना काळात सर्वेक्षण

कोरोना संकटामुळे भारतीयांच्या बचतीच्या सवयीत बदल झाला आहे. जवळपास ५५ टक्के भारतीय कोरोनासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी जास्त बचत करू इच्छित आहेत. फिनटेक कंपनी पे निअरबायच्या “इंडिया सेव्हिंग्ज बिहेवियर’ अहवालात ही बाब समोर आली आहे. जवळपास १०,००० नागरिकांच्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात बचतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. अहवालानुसार, ४७% टक्के लोकांच्या वित्तीय नियोजनात दोन गोष्टी समोर आल्या. प्रथम, कालमर्यादेबाबत लवचिकपणा आणि दुसरे, बचतीच्या किमान रकमेवर कोणतेही बंधन नसली पाहिजेत. लवचिकपणा म्हणजे कधीही पैसा काढण्याच्या सुविधेची गरज कोरोना संकटात जास्त भासली. दुसरीकडे, ६५ टक्क्यांहून जास्त लोकांनी सांगितले की, ते बँकिंग, पोस्ट कार्यालय आदीद्वारे बचत करण्यापासून वाचतात. कारण, त्यांच्याकडे नियमित रोकड प्रवाह शक्य नसतो. भविष्यात परताव्या तुलनेत सध्या लिक्विडिटीची आवश्यकता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. ३५ टक्क्यांहून जास्त लोकांनी सांगितले की, बचत करताना त्यांचा प्राथमिक उद्देश स्वत:ला आणि घराच्या अनावश्यक खर्च रोखणे आहे.

६५ टक्के लोकांचे म्हणणे होते की, नियमित बचतीची त्यांना सवय नाही. याउलट ते अतिरिक्त पैशाच्या रूपात पैशाची बचत जमा करू इच्छितात. या व्यतिरिक्त पैसा जुळवून आपले लहान व मध्यम जीवन उद्दिष्ट पूर्ण करू इच्छितात. म्हणजे, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा करणे, दागिने खरेदी, जमीन खरेदी किंवा घर बांधणे यासारख्या आवश्यक गरजा पूर्ण करू इच्छितात. सर्वेक्षणाच्या निष्कर्षावर टिप्पणी करत पे निअरबायचे एमडी आणि सीईओ आनंदकुमार बजाज म्हणाले, महारोगराईने आपल्या सर्वांना सर्वात मोठी शिकवण ही दिली की, आम्ही आपले आरोग्य आणि आर्थिक पायाभूत आराखड्यात गुंतवणूक करण्याची गरज आहे. यामुळे आम्ही सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयार आहोत. वैयक्तिक रूपात आपण आजूबाजूच्या लोकांची सुरक्षा निश्चित करण्यात भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे.

बचतीसाठी सोपा पर्याय असल्यास जास्त प्रमाणात जमा होते रक्कम

४३ टक्के लोकांनी सांगितले की, बचतीसाठी उपलब्ध पर्यायांच्या संचालनाबाबतीची प्रक्रिया कठीण आहे. ४० टक्क्यांहून जास्त लोकांनी सांगितले की, कागदोपत्री कार्यवाही आणि अन्य प्रक्रियांमुळे औपचारिक बचत उत्पादनाची निवड करत नाहीत. पैसा जमवण्यासाठी प्रवास करण्यात वेळ लागतो हे त्यांच्यासाठी खूप गैरसोयीचे ठरते. यासोबत अर्ज भरण्यासह विविध अन्य प्रक्रियांसाठी वेळ वाया घालवावा लागतो. या नादात अनेकवेळा त्यांना आपल्या एका दिवसाच्या वेतनावर पाणी सोडावे लागते.

बातम्या आणखी आहेत...