आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतीमान जीवनासाठी 5G सेवा ठरेल संजीवनी:10 सेकंदात 2 जीबीचा चित्रपट होईल डाऊनलोड, गेमचा घेता येईल आनंद; जाणून घ्या फायदा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारतात लवकरच 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध होणार आहे. एअरटेल आणि जीओ कंपनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 5G नेटवर्क सेवा कार्यान्वित करण्यासाठी कामाला लागले आहे. एअरटेलने यासाठी एरिक्सन, नोकीया आणि सॅमसंग सोबत 5G नेटवर्कचा करार केला आहे. दरम्यान, 5G नेटवर्क सेवा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांची कामे गतीमान होणार आहे.

चित्रपट अगदी काही सेकंदात डाऊनलोड होईल. तर ऑनलाईन गेम खेळतांना ग्राहकांना द्विगुणित आनंद मिळेल. परंतू ही सेवा घेताना ग्राहकांना त्यांचा स्मार्टफोन 5G साठी बदलावा लागेल का ? तुमचा खर्च महागाईप्रमाणे वाढणार आहे का ? हे सर्व प्रश्न सर्वांच्या संबंधित आहेत. चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

प्रश्न - 4G नेटवर्कपेक्षा 5G कसे वेगळे आहे?
उत्तर - मोबाईल नेटवर्क हे 5G वायरलेस नेटवर्कसाठी जागतिक मानक आहे. जे 4G नेटवर्कच्या क्षमता सुधारेल. 5G ची कनेक्टिव्हिटी खूप वेगवान असेल. गेमिंग आणि मनोरंजनाच्या बाबतीतही ते उत्कृष्ट ठरणार आहे. 5G चा वेग 4G च्या वेगापेक्षा 100 पट जास्त असू शकतो. याद्वारे तुम्ही फक्त 10 सेकंदात 2 GB चित्रपट डाउनलोड करू शकाल.

सूचना - तुमच्या 4G मोबाईलमध्ये 5G नेटवर्क काम करणार नाही. यासाठी 5G फोन असणे आवश्यक आहे. जर वायफाय 5G स्पीडमध्ये चालत असेल आणि तुम्ही तुमचा मोबाइल त्याला जोडला असेल तर तुम्हाला 5G स्पीड मिळू शकेल.

प्रश्न- कोणती कंपनी भारतात प्रथम 5G सेवा सुरू करू शकते?
उत्तर-
जिओ आणि एअरटेल देशातील काही प्रमुख शहरांमधून 5G सेवा सुरू करणार आहेत. 5G सेवा ऑगस्ट 2022 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रश्न- 5G लाँच होण्यापूर्वी 5G स्मार्टफोन घ्यायचा तर बजेटमध्ये कोणता फोन येऊ शकेल?
उत्तर-
बाजारात अनेक प्रकारचे स्मार्टफोन आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला 20 हजार रुपयांखालील काही पर्याय सांगत आहोत. जे एक उत्तम 5G स्मार्टफोन पर्याय ठरू शकतात.

POCO M4 5G- यामध्ये तुम्हाला मिळेल...

 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 12,999 रुपये आहे.
 • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 14,999 रुपये आहे.
 • फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ते Android 12 वर काम करते. 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
 • 6.58-इंच फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले. ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 SoC सह सुसज्ज.
 • ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आणि दुसरा 2 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G - यामध्ये तुम्हाला मिळेल...

 • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 19,999 रुपये आहे.
 • फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर त्यात Android 12 देण्यात आला आहे.
 • 6.59-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे आणि फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारे समर्थित असेल.
 • एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर देखील आहे.
 • 2 मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 9 5G SE- यामध्ये तुम्हाला मिळेल...

 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 14,999 रुपये आहे.
 • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 17,499 रुपये आहे.
 • फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर त्यात Android 11 देण्यात आला आहे.
 • 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आहे.
 • एक ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये सेन्सर 48 मेगापिक्सेल आहे. दुसरा 2 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा आहे.
 • सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर असून 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

प्रश्न- 5G नेटवर्क आल्याने तुम्हाला काय फायदा होईल?
उत्तर-
मोबाईल फोनच्या जगात अनेक बदल पाहायला मिळतात.

 • 4G नेटवर्क आले असूनही, ते अनेक क्षेत्रांमध्ये उपलब्ध नाही, परंतु 5G च्या माध्यमातून दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कची श्रेणी वाढवण्याचा आणखी एक मार्ग मिळेल.
 • तुम्ही उच्च दर्जाच्या, अल्ट्रा हाय रिझोल्युशन 4K व्हिडिओ कॉलवर बोलू शकाल.
 • वायफाय नेटवर्क नसतानाही व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ चॅटचा लाभ मिळणार आहे.
 • फोनवर गेम खेळणे पूर्वीपेक्षा चांगले होईल.
 • इंटरनेटचा वेग 4G पेक्षा जास्त असेल.

प्रश्न- 5G नेटवर्कचा इंटरनेट प्लॅन किती रुपयांना मिळेल?
उत्तर- सध्या याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 4G प्लॅनच्या किमतींवरून हे थोडे महाग असू शकते असे मानले जात असले तरी. कारण बाजारातील स्पर्धा लक्षात घेता, कंपन्या 5G लॉंचच्या सुरूवातीला योजनांची किंमत कमी ठेवू शकतात आणि नंतर ती वाढवू शकतात.

एअरटेल 5G मध्ये कसे आघाडीवर आहे

 • 2018 मध्ये भारतात 5G तंत्रज्ञानाची चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी होती.
 • गेल्या वर्षी, एअरटेलने दिल्लीच्या बाहेरील भागात देशातील पहिली ग्रामीण 5G चाचणी देखील घेतली.
 • 700 MHz बँडवर 5G ची चाचणी करणारी Airtel ही पहिली कंपनी ठरली.
बातम्या आणखी आहेत...