आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेन्सेक्स-निफ्टी विक्रमी पातळीवर पाेहाेचले हाेते. सेन्सेक्स अाताही ६२ हजारांच्या जवळ गेला अाहे. मात्र यात सहभागी असलेले अनेक ब्ल्यूचिप शेअर १० वर्षांच्या जवळपास ७०% ने सरासरी मूल्यापेक्षा कमी आहे. ओएनजीसी, टाटा स्टील, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी आणि डॉ. रेड्डीज लॅबचा यात समावेश आहे. गुंतवणुकीची ही चांगली संधी आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या ‘बुल्स अँड बेअर्स’ अहवालानुसार, ओएनजीसीचे ट्रेडिंग १० वर्षांच्या सरासरी किमतीपेक्षा सुमारे ७२% डिस्काउंटवर होते. टाटा स्टीलच्या शेअरचे मूल्यांकनही १० वर्षांच्या सरासरीपेक्षा ६३% खाली आहे.
सप्टेंबरनंतर बाजाराने केले चांगले पुनरागमन या वर्षी सप्टंेबरनंतर देशांतर्गत शेअर बाजाराने चांगले पुनरागमन केले. यात वर्षभराच्या घसरणीची वसुली झाली. वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात निफ्टीने ८% पेक्षा जास्त वाढीची नोंद केली.
छोट्या गुंतवणूकदारांना मिळाला नाही रॅलीचा फायदा जिओजित फायनान्शियल सेवेचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. विजयकुमार यांनी सांगितले, नुकतेच तेजीत मोठ्या कंपन्याच्या समभागांनी लघु आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा चांगली कामगिरी केली. या नोव्हेंबरपर्यंत निफ्टी जेथे ८ टक्क्यांपर्यंत वाढला.
जागतिक बाजारावर फेडची आक्रमक भूमिका अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांमुळे आक्रमक भूमिकेनंतर जगभरातील बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ८७९ अंकांच्या तोट्यासह ६१,७९९ वर बंद झाला. निफ्टीमध्ये २४५ अंकांची घसरण राहिली. हा १८,४१४ वर बंद झाला. विश्लेषकांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेने बाजाराला आश्चर्याचा धक्का बसला आहे. महागाई अपेक्षेपेक्षा जास्त खाली आल्याने गुंतवणूकदारांना केंद्रीय बँकेकडून अधिक अनुकूल भूमिकेची अपेक्षा होती. फेडने व्याजदरांमध्ये ०.५०%च्या वाढीसह संकेत दिले की, २०२३ अखेर दर ५% पेक्षा वर जाऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.