आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉफी पिणे, लंच करण्यासाठी धावणारे लोक. लोकल ट्रेन स्टेशनवर हेडफोन लावलेल्या टेक कामगारांची वर्दळ. फुटपाथवर लोकांची गर्दी. तीन वर्षांपूर्वी असे चित्र सॅनफ्रान्सिस्कोमध्ये बघायला मिळत होते. पण आता तसे नाही. अमेरिकेत टेक्नॉलॉजी कंपन्यांसाठी प्रसिद्ध या शहरातील व्यावसायिक क्षेत्रातील रौनक आता धुसर झाली आहे. सलाड आणि फूड कंपनी मिक्स्टच्या व्यवस्थापक मारिया सेरोस मरकाडो म्हणाल्या, एकेकाळी हा परिसर लोकांमुळे भरून असायचा.पण, आज हा अमेरिकेतील सर्वात उजाड व्यावसायिक परिसर आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिल्याने कार्यालये रिकामी आहेत. सॅनफ्रान्सिस्कोत कोणत्याही दिवशी कंपन्यांची कार्यालये महामारीच्या काळापेक्षा ६० टक्के रिकामी राहत आहेत. २०१९ मध्ये ५ टक्के नोकऱ्या रिक्त होत्या. आता २४ टक्के आहेत. टेक कंपनी येल्पचे प्रमुख जेरेमी स्टोपलमॅन यांनी बऱ्याच दिवसांपासून कंपनीचे मुख्यालय असलेली इमारत रिकामी केली आहे. त्यांच्या ४४०० कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याची सुविधा आहे. असेच निर्णय इतर कंपन्यांनीही घेतले आहेत. त्यामुळे इमारतीचे मालक आणि व्यावसायिकांना भविष्याची चिंता भेडसावत आहे. सॅनफ्रान्सिस्कोतील परिस्थितीमुळे प्रश्न निर्माण झालाय की जर घरूनच अधिक व्यवहार होऊ लागले तर अमेरिकेतील दुसऱ्या सेंट्रल बिझनेस िडस्ट्रिक्टचे काय होईल? ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशनमध्ये शहरी संपत्तीवर अभ्यास करणारी ट्रेसी हेडन लोह म्हणाले, अशा जंगलाची कल्पना करा तेथील सर्व प्रजाती अचानक बेपत्ता झाल्यात. दुसऱ्या व्यावसायिक परिसरांतही असेच होत आहे. शहरातील प्रमुख अर्थतज्ज्ञ टेड एगन यांनी कराच्या घसरणीबाबत सावध केले आहे. बिझनेस समूह आणि शहरातील नेत्यांना आशा आहे की, सॅनफ्रान्सिस्कोत रहिवासी क्षेत्र अधिक बनवले जातील.
सिलिकॉन व्हॅलीच्या केंद्रापासून सुमारे ७० किमीवरील सॅनफ्रान्सिस्कोला काही वर्षांपूर्वी नवीन कंपन्यांसाठी चांगले स्थळ मानले जायचे. त्याच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये विमा कंपन्या आणि बँक अधिक होत्या. १९९० च्या दशकाअखेर डॉट कॉम कंपन्यांचा पूर आल्यानंतर सॅनफ्रान्सिस्कोच्या जवळपास टेक्नॉलॉजी कंपन्यांनी पाय रोवण्यास सुरुवात केली होती. पण, डॉटकॉम बिझनेसचा फुगा फुटल्याचा परिणाम टेक कंपन्यांवरही पडला होता. तरीही, दहा वर्षांनंतर टि्वटर, लिफ्ट, उबर, ड्रॉपबॉक्स, रेडिट आणि एअरबीएनबीसह अनेक कंपन्यांनी शहर सीमेत आपली कार्यालये थाटली. तिकडे, महामारीनंतर अमेरिकेतील अनेक व्यावसायिक क्षेत्र रिकामे झालेत. यामुळे आस्टिन, स्पोकानेसारख्या शहरांत घरांची मागणी वाढली. बिझनेस डिस्ट्रिक्टसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.
अनेक कंपन्यांत तीन दिवसांचा आठवडा सुरू काही कंपन्यांमध्ये तीन दिवसांचा आठवडा सुरू आहे. सॅनफ्रान्सिस्कोतील काही व्यवसाय नवीन परिस्थितीनुसार चालण्यासाठी मार्ग शोधत आहेत. फूड कंपनी मिक्स्ट कामगारांना त्यांच्या घरी सलाड आणि जेवण पाठवत आहे. फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये जेवणावेळी मिक्स्टची प्रमुख अधिकारी लेसली सिल्व्हरग्लाइड कंपनीच्या रेस्टॉरंटमध्ये बुधवारी कामगारांच्या गर्दीकडे बोट दाखवतात. लोक बाहेर रिकाम्या टेबलकडे जात होते. तरीही, सॅनफ्रान्सिस्कोमध्ये बुधवारी महामारीच्या पूर्वीच्या तुलनेत ५० टक्केच उपस्थिति राहते. शुक्रवारी तर ३० टक्के लोकही राहत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.