आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 60% Recruiters Will Offer Jobs To Freshers In Next 6 Months; Preference Will Be Given To Those Who Have Studied Biotech, Data Science

रिक्रूटमेंट ट्रेंड:पुढील 6 महिन्यांत 60% रिक्रूटर फ्रेशर्सना देतील नोकऱ्या; बायोटेक, डेटा सायन्स शिकलेल्यांना मिळणार प्राधान्य

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतातील ५९ टक्क्यांपेक्षा अधिक नियोक्ता (नोकऱ्या देणारे) यंदा जुलै ते डिसेंबरदरम्यान एंट्री लेव्हल नोकऱ्यांसाठी फ्रेशर्सना कामावर घेणार आहेत. जानेवारी ते जून २०२२ च्या तुलनेत या संख्येत १२ टक्के आणि जुलै ते डिसेंबर २०२१ च्या तुलनेत ४२ टक्के वाढ झाली आहे. टीमलीज अॅडटेकच्या करिअर आऊटलूक अहवालात हे आकडे समोर आले.

अहवालानुसार, आता मोठ्या संख्येने नियोक्ता मनुष्यबळात फ्रेशर्सना संधी देऊ इच्छित आहेत. याआधी नौकरी डॉट कॉमच्या जॉब स्पीक अहवालात म्हटले होते, की फ्रेशर्सना कामावर घेण्याची ६१ टक्के नियोक्त्यांची इच्छा आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या भरतीच्या योजनेत फ्रेशर्ससाठी जागा निश्चित केल्या आहेत. उदाहरणार्थ, एचसीएल २०२३ या आर्थिक वर्षात ३० ते ३५ हजार फ्रेशर्सना कामावर घेणार आहे. याप्रमाणेच विप्रो पुढील वर्षी ३० हजार फ्रेशर्सना कामावर घेईल. तज्ञांंच्या मते, फ्रेशर्सच्या भरतीमध्ये येत्या काही वर्षांतही वाढ होईल. अशा परिस्थितीत शिक्षण संपवून तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे.

आयटीमध्ये एक लाख नोकऱ्या; अॅनालिटिक्स, ब्लॉकचेनला असेल मागणी अशा पद्धतीने बना नोकरीयोग्य नॅसकॉमच्या नुसार, भारतीय आयटी उद्योगाला २०२६ पर्यंत ९५ लाख व्यावसायिकांची गरज असेल. डिजिटल मनुष्यबळ तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, नॅसकॉमने फ्यूचर स्किल्स प्राईम कार्यक्रम सुरू केला आहे. याद्वारे आयटी मनुष्यबळतयार करण्याचे काम केले जाते. तुम्ही यात सहभागी होऊ शकता. अपग्रेड, लिंक्डईनसह विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर संबंधित ऑनलाइन कोर्स करू शकता.

काही महिन्यांत अॅफिलिएट मार्केटिंग स्पेशालिस्ट, डेटा सायंटिस्ट, मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट, वेलनेस स्पेशालिस्ट, युजर एक्सपीरियन्स रिसर्चरसारख्या नोकऱ्या फ्रेशर्सना मिळतील. दुसरीकडे प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा, इथिकल हॅकिंग, ब्लॉकचेन, बायोटेक्नॉलॉजी अँड बिझनेस, अॅनालिटिक्स या कौशल्यांना मागणी राहील. भरती करताना तुमचे नेतृत्वगुण, इमोशनल इंटेलिजन्स आणि क्रिएटिव्हिटीही पाहिली जाईल. यासोबतच ब्लॉकचेन, बायोटेक्नॉलॉजी, सायबर सुरक्षा, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिझनेस अॅनालिटिक्ससारखे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना भरतीमध्ये प्राधान्य मिळेल. एकट्या आयटी क्षेत्रात एक लाख फ्रेशर्सना नोकऱ्या मिळतील हे उल्लेखनीय आहे.

यांची वाढेल मागणी २०२६ पर्यंत ५५ लाख असे उमेदवार हवे असतील ज्यांच्यात क्लाऊड कॉम्प्युटिंग, एआय, बिग डेटा अॅनालिटिक्स ही कौशल्ये असतील. टेलिकॉममध्ये रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग तज्ञांची गरज असेल.

नोकऱ्या देतील हे क्षेत्र आणि शहरे क्षेत्र जॉब% शहर जॉब% आयटी 65 बंगळुरू 68 ई-कॉमर्स व 48 मुंबई 50 टेक स्टार्टअप्स टेलिकम्युनिकेशन 47 दिल्ली 45 {स्रोत : टीमलीजचा करिअर आऊटलूक अहवाल

बातम्या आणखी आहेत...