आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबिट इंडेक्स 2021:5 वर्षांत 60 पट डेटा ट्रॅफिक, भारतीयांनी स्मार्टफोनवर रोज घालवले पाच तास

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 मध्ये डेटा ट्रॅफिक 36% वाढला, 10 कोटी नवे 40-जी ग्राहक जोडले, एकूण संख्या 70 कोटी पार

डेटा वापर वाढण्याच्या प्रकरणात भारत जगातील अग्रणी देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. गेल्या ५ वर्षांदरम्यान येथे डेटा ट्रॅफिक ६० पटीपेक्षा जास्त वाढला असून हा जागतिक पातळीवर सर्वात अधिक डेटा ट्रॅफिक वृद्धीपैकी एक आहे. नोकियाने गुरुवारी जारी केलेल्या मोबाइल ब्रॉडबँड इंडिया ट्रॅफिक (एमबिट) इंडेक्स, २०२१ मधून ही माहिती समोर आली आहे. कोविड-१९ महामारीदरम्यान बहुतांश वेळ घरात राहण्याच्या नाइलाजाचा चकित करणारा परिणाम दिसला. एमबिट इंडेक्सनुसार फोरजी डेटा वापरामुळे वर्ष २०२० मध्ये डेटा ट्रॅफिक दरवर्षी ३६% वाढला. यादरम्यान १० कोटी नव्या फोरजी ग्राहकांसह फोरजी ग्राहकां संख्या ७० कोटींवर गेली आहे. देशभरात एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये एकट्या फोरजीचे योगदान ९८.७ टक्के राहिले. फोरजी हँडसेट बाळगणाऱ्यांची संख्या ६०.७ कोटी पार झाली .

ग्रामीण भारताचे मोठे योगदान

देशात दरमहा डेटा वापर वाढण्याचे एक कारण ग्रामीण भागांत वेगाने वाढणारे नवे यूजर्स आहेत. मोबाइल हँडसेट करमणूक व उत्पादकतेच्या रूपात पुढे आले आहे. गेल्या काही वर्षांदरम्यान परवडणाऱ्या फोरजी हँडसेटच्या पुरवठ्यात वाढ व सरकार डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे हे यामागचे कारण आहे.

अहवालात हेही

२०१५-२०२० दरम्यान दरमहा सरासरी डेटा वापरात ७६%ची मोठी वाढ पाहायला मिळाली.

देशात आधीपासून जवळपास २० लाख सक्रिय फाइव्ह जी उपकरणे आहेत.

२०२५ पर्यंत शॉर्ट कंटेंटची मागणी दरमहा चौपट वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षांत

२०१५-२०२० पर्यंत दरमहा सरासरी डेटा वापरात ७६ टक्क्यांची वाढ

व्हॉइस ओव्हर एलटीई(व्हीओएलटीई) स्मार्टफोनची संख्या ५६.३ कोटी

एकूण एलटीई हँडसेटमध्ये ९३% हिस्सेदारी युजर अद्यापही टूजी/थ्रीजी सेवांवर अवलंबून आहेत.

२०२० ची स्थिती

२०% वाढून १३.५ जीबीपर्यंत, प्रति युजर मासिक डेटा वापर

७७% पातळीवर पोहोचला फोरजी क्षमतेच्या उपकरणांचा प्रसार

६३% राहिला मोबाइल ब्रॉडबँड प्रसार, फिक्स्ड ब्रॉडबँड प्रसार ७.५%

५ तास खर्च केले प्रत्येक भारतीयाने प्रतिदिन सरासरी गेल्या ५ वर्षांत

बातम्या आणखी आहेत...