आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक कल:63 % भारतीयांची अनावश्यक खर्चाला कात्री

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई आणि त्यावर नियंत्रणासाठी वाढवण्यात आलेल्या व्याजदराचा खोल परिणाम दिसून आला आहे. ७४% भारतीय वैयक्तिक खर्च आणि बचतीबद्दल चिंतेत आहेत. यामुळे, निम्म्याहून अधिक लोक रेस्टॉरंटमधील रात्रीच्या जेवणासारखे अनावश्यक खर्च कमी करायला निघाले आहेत. रिझर्व्ह बँकेने या आठवड्यात शक्यतेच्या उलट रेपो दरात वाढ न करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. पीडब्ल्यूसी ग्लोबल कंझ्युमर इनसाइट्स पल्स केलेल्या सर्वेक्षणात १० पैकी सहा भारतीयांनी (६३%) सांगितले की, ते पुढील सहा महिन्यांत अनावश्यक खर्च कमी करतील. दिल्ली, मुंबई यांसारख्या देशातील १२ प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, एका वर्षापासून वाढत्या महागाईमुळे मोठ्या संख्येने भारतीय दैनंदिन खर्चामुळे चिंतेत आहेत.

...पण तरुण रिव्हेंज ट्रॅव्हल चालू ठेवतील सर्वेक्षणात एक वेगळा कल आढळून तो असा की, १९९७ किंवा नंतर (झेन जी) जन्मलेले तरुण आणि १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला (मिलेनिअल्स) जन्मलेले भारतीय रिव्हेंज ट्रॅव्हल सुरू ठेवतील. कोविडकाळात इच्छा असूनही प्रवास करू न शकलेले बहुतांश तरुण त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात कोणताही बदल करणार नाहीत.

पर्यावरणपूरक घरगुती उत्पादनांवर भर सर्वेक्षण अहवालात कलदेखील नमूद केला आहे. ८०% पेक्षा जास्त पात्र लोक अशा उत्पादनांवर थोडा जास्त खर्च करण्यास तयार आहेत, जे देशात उत्पादित केले जातात आणि पर्यावरणास अनुकूल आहेत. पुनर्वापर केलेल्या वस्तूंपासून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. देशात अशा उत्पादनांची उपलब्धताही हळूहळू वाढत आहे.

बचतीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी, स्वस्त ब्रँडकडे कल सर्वेक्षण अहवालानुसार देशातील सर्वसामान्य ग्राहक पुढील सहा महिन्यांसाठी बचतीचे मार्ग अवलंबतील. यामध्ये सवलतीच्या खरेदीचा समावेश आहे. पीडब्ल्यूसी इंडियाचे भागीदार आणि प्रमुख (किरकोळ आणि ग्राहक) रवी कपूर म्हणाले की, बचतीवरील ताणाचा इलेक्ट्रॉनिक्स आणि लक्झरीसारख्या अत्यंत अनावश्यक खर्चावर परिणाम होईल. आवश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून बचत होत असेल तर लोकही तसेच करतील.