आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवाळीत चीनमध्ये उत्पादित साहित्यावर बहिष्काराच्या आवाहनाच्या पृष्ठभूमीवर लहान दुकानदारांनी या दिवाळीला ७२,००० कोटी रुपये किमतीच्या स्वदेशी साहित्याची विक्री केली. ‘कॅट’ या लहान व्यापाऱ्यांच्या देशव्यापी संघटनेने हा दावा केला.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनुसार (कॅट) विक्रीचा हा आकडा २० शहरांतून मिळालेल्या डेटावर आधारित आहे. भारताची अग्रणी वितरक शहरे अशी त्यांची ओळख आहे. त्यात नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनऊ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सुरत, कोची, जयपूर आणि चंदीगड या शहरांचा समावेश आहे. ‘कॅट’च्या दाव्यानुसार, चिनी साहित्यावर बहिष्कारामुळे चीनला ४०,००० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आमच्या आवाहनानुसार लहान दुकानदारांनी चिनी साहित्याची विक्री केली नाही. दिवाळीत झालेल्या चांगल्या विक्रीमुळे लहान दुकानदार आनंदित आहेत. आपले देशभरात सात कोटींपेक्षा जास्त सदस्य असल्याचा ‘कॅट’चा दावा आहे.
या वस्तूंची सर्वाधिक विक्री
एफएमसीजी साहित्य, टिकाऊ वस्तू, खेळणी, विजेची उपकरणे आणि साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाकाचे साहित्य, मिठाई, फर्निचर, भांडी, सोने आणि दागिने, पादत्राणे, घड्याळे या वस्तूंची दिवाळीत सर्वाधिक खरेदी झाली. कपडे, फॅशन अॅपरल्स आणि गृह सजावटीच्या साहित्याचीही खरेदी झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.