आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:जानेवारी-मार्चदरम्यान ब्ल्यू आणि ग्रे कॉलर नोकऱ्यांत 73% वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडनंतर, देशातील सर्व बाजारपेठा सुरू झाल्यानंतर ग्राहकांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नाेकरी बाजार गजबजला आहे. डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मार्च तिमाहीत नोकऱ्यांमध्ये ७३% वाढ झाली. नोकऱ्या ब्लू कॉलर (उत्पादन, बांधकाम आणि खाणकाम यांसारख्या क्षेत्रातील कष्टकरी कामगार) आणि ग्रे कॉलर (आरोग्यसेवा व्यावसायिक, पोलिस सेवा, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल इ.) श्रेणींमध्ये निर्माण झाल्या आहेत.

ब्लू आणि ग्रे कॉलर जॉब प्लॅटफॉर्म ‘क्यूजाॅब’च्या अहवालानुसार, बीपीओ ( बिझिनेस प्राेसेस आऊटसाेर्सिंग), ग्राहक सेवा आणि वितरण विभागामध्ये जानेवारी-मार्च दरम्यान सर्वाधिक ३०% नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, डेटा एंट्री-बॅक ऑफिस, फील्ड विक्री आणि किरकोळ विक्रीत अनुक्रमे १०%, ६% आणि ४% वाढ झाली. मार्च तिमाहीत दिल्लीमध्ये ब्लू आणि ग्रे कॉलर श्रेणीतील सर्वाधिक १५% नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. बंगळुरू (१४), मुंबई (१३)आणि हैदराबाद (८%) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...