आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना प्रभाव:काेराेनाने अग्रिम कर संकलनात 76% घसरण, प्रत्यक्ष करात फक्त 31% घट, प्राप्तिकर विभागाच्या अाकडेवारीतून समाेर अाली माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 48917 काेटी कर गेल्या वर्षात मिळाला

परतावा दिल्यानंतर सरकारकडे उरतील ९२,६८१ काेटी रुपये, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ % कमी काेराेना व्हायरस महामारी अाणि दाेन महिन्यांच्या लाॅकडाऊनचा प्रतिकूल परिणाम केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनावरही झाला अाहे. केंद्र सरकारच्या अग्रिम कर संकलनात या कालावधीत ७६ % घट झाली अाहे. परंतु, एकूण प्रत्यक्ष कर संकलनात फक्त ३१ टक्के झालेली घट दिलासा देणारी अाहे. प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या अाकडेवारीतून ही बाब समाेर अाली अाहेे.

कंपन्या अाणि व्यक्तिगत करदात्यांना अापल्या वर्षभरातील संभाव्य उत्पन्नाचा अाढावा घेऊन त्याच्या तुलनेत १५ % हिस्सा १५ जूनपर्यंत अग्रिम कर स्वरूपात जमा करावा लागताे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत अर्थ मंत्रालयाकडे अग्रिम कराच्या रूपातून ४८,९१७ काेटी रुपये जमा झाले हाेते. या वर्षी ही रक्कम १५ जूनला केवळ ११,७१४ काेटी रुपये नाेंद झाली. जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के कमी अाहे. अग्रिम कंपनी कराबाबत सांगायचे तर ताे व्यक्तिगत प्राप्तिकराच्या तुलनेत जास्त अाहे. अग्रिम कंपनी करात ७९ टक्के घट नाेंद झाली अाहे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत ३९,४०५ काेटी रुपये अग्रिम कर संकलनाच्या रूपाने जमा झाले हाेते. या वर्षी ही रक्कम ८,२८६ काेटी रुपये इतकीच अाहे. अग्रिम व्यक्तिगत प्राप्तिकरात यंदा ६३ टक्के घट झाली अाहे. िवश्लेषण : कंपनी कराच्या तुलनेत प्राप्तिकरात कमी घट कंपन्या अाणि व्यक्तिगत करदात्यांना अापल्या वर्षभरातील संभाव्य उत्पन्नाचा अाढावा घेऊन त्याच्या तुलनेत १५ % हिस्सा १५ जूनपर्यंत अग्रिम कर स्वरूपात जमा करावा लागताे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत अर्थ मंत्रालयाकडे अग्रिम कराच्या रूपातून ४८,९१७ काेटी रुपये जमा झाले हाेते. या वर्षी ही रक्कम १५ जूनला केवळ ११,७१४ काेटी रुपये नाेंद झाली. जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के कमी अाहे. अग्रिम कंपनी कराबाबत सांगायचे तर ताे व्यक्तिगत प्राप्तिकराच्या तुलनेत जास्त अाहे. अग्रिम कंपनी करात ७९ टक्के घट नाेंद झाली अाहे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत ३९,४०५ काेटी रुपये अग्रिम कर संकलनाच्या रूपाने जमा झाले हाेते. या वर्षी ही रक्कम ८,२८६ काेटी रुपये इतकीच अाहे. अग्रिम व्यक्तिगत प्राप्तिकरात यंदा ६३ टक्के घट झाली अाहे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत ९,५१२ काेटी रुपये अग्रिम व्यक्तिगत प्राप्तिकर संकलन झाले हाेते. या वर्षी ३,४२८ काेटी रुपयांचे संकलन झाले अाहे. परंतु, एकूण प्रत्यक्ष करात याच कालावधीत केवळ ३१ टक्के घसण झाल्याने दिलासा मिळाला अाहे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत अर्थमंत्रालयाकडे प्रत्यक्ष करापाेटी १,९९,७५५ काेटी रुपये मिळाले. परतावा दिल्यानंतर सरकारकडे १,३६,९४१ काेटी रुपये शिल्लक हाेते. या वर्षी अर्थमंत्रालयाकडे प्रत्यक्ष करापाेटी १,३७,८२५ काेटी रुपये जमा झाले. परतावा दिल्यानंतर सरकारकडे ९२,६८१ काेटी रुपये शिल्लक राहतील. त्यामुळे एकूण प्रत्यक्ष कर संकलनात ३२ % घट झाली अाहे. या वर्षी अर्थसंकल्पात सरकारने एकूण १३.१९ लाख काेटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलन हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. जाे मागील वर्षातल्या १०.२८ लाख काेटी रुपयांच्या अंदाजाच्या तुलनेत जवळपास ३० % जास्त अाहे.

एकूण प्रत्यक्ष कर संकलनात माेठा वाटा टीडीएसचा म्हणून जास्त घट झ‌ाली नाही

चार्टर्डट नवीन गुप्ता म्हणाले, एकूण प्रत्यक्ष कर संकलनात टीडीएसचा माेठा वाटा अाहे. बहुतांश सेवा सुरू असल्याने एकूण प्रत्यक्ष कर संकलनात जास्त घट झाली नाही. पण पुढे परिस्थिती सुधारली नाही तर याचा माेठा भाग परताव्याच्या रूपाने निघून जाऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...