आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:आशियातील 76 टक्के गुंतवणूकदार फक्त भारतातच गुंतवणूक करतात, दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात जोरदार शक्यता दिसून येत आहे. त्यामुळेच ऑगस्टमध्ये आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी आशियामध्ये केलेल्या एकूण गुंतवणुकीचा सुमारे ७६ टक्के भाग फक्त एकट्या भारतीय शेअर बाजारात लावला आहे. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय)ने या महिन्यात आतापर्यंत आशियाच्या नऊ प्रमुख बाजारांत ७.५ अब्ज डॉलर (५९,८७६ कोटी रुपये) निव्वळ गुंतवणूक केली.

ब्लूमबर्गच्या आकड्यांनुसार, यापैकी सर्वात जास्त ५.७ अब्ज डॉलर (४५,५०६ कोटी रुपये) भारतीय बाजारात आले. सुमारे २ अब्ज डॉलर गुंतवणुकीसह दक्षिण कोरिया या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विश्लेष्कांच्या मते, चीनला साेडून इतर आशियाई बाजारांविषयी परकीय गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. विशेष म्हणजे, भारतीय बाजारात त्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. खरे तर, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते या वर्षी जूनपर्यंत परकीय गुंतवणूकदरांनी भारतीय बाजारात विक्रमी ३३ अब्ज डॉलर (सुमारे २.६० लाख कोटी रुपये)ची विक्री केली होती. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताना पाहून ते धमाकेदार पुनरागमन करत आहेत.

विदेशी गुंतवणुकीचा वेग कायम राहू शकेल

एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूक कायम राहायला हवी. त्यांनी याची चार कारणे सांगितली...

1. जागतिक वातारणात मोठ्या देशांत भारत सर्वात वेगाने आर्थिक विकास करणारा बाजार ठरला.

2.कौटुंबिक बचत यात सोने, बँक एफडीसारख्या पारंपरिक गुंतवणुकीत निघून आर्थिक साधनांमध्ये प्रवेश

3.सुमारे १३० कोटींच्या भव्य लोकसंख्येच्या देशात चालणाऱ्या भारतात मागणीमुळे साधन नाही.

4.समभागाचे जास्त भाव पीई रेशोनुसार आहेत. रिटर्न ऑन इक्विटीच्या पातळीवर भारत आताही आकर्षक

ख्रिसचा भारतीयांवर भरवसा

अमेरिकेची दिग्गज गुंतवणूक बँक कंपनी जेफरीजचे जागतिक इक्विटी प्रमुख ख्रिस्तोफर वूड यांनी भारतीय बाजारावर बराच विश्वास दाखवला आहे. त्यांनी दीर्घकाळासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आशियाई बाजारांची जी भागीदारी ठेवली.

व्याजदराचा परिणाम नाही

महागाईवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचा शेअर बाजारावर परिणाम झालेला नाही. आरबीआयने मेपासून रेपो दरात १.४०% वाढ केली. निफ्टी जूनच्या मध्यापासून १६.५% वाढले. एमएससीआय इंडिया इंडेक्सने एसी आशिया-पॅसिफिक इंडेक्स मागे टाकले.

सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीने बंद

आंतरराष्ट्रीय बाजारात मजबुतीदरम्यान शुक्रवारी सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ वाढ दिसली. सेन्सेक्स ५९ अंकांवर वाढीसह ५८,८३४ वर बंद झाला. निफ्टीमध्ये ३६ अंकांची तेजी दिसली. तो १७,५५९ अंकांवर बंद झाला. ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स ५४७ अंकांच्या उच्चांकीसह ५९,३२२ पर्यंत पोहोचले. सेन्सेक्समध्ये ८१२ अंक (१.३६%), निफ्टीमध्ये २०० अंक (१.१२%)ची घसरण दिसली.

बातम्या आणखी आहेत...