आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 77% Of People Want To Buy A Home This Year, The Result Of A Steady Rise In Prices And Interest Rates

सर्वेक्षण:77% लोकांना यंदा घर घेण्याची इच्छा, किमती आणि व्याजदर सलग वाढल्याचा परिणाम

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा घर विकत घेणार असल्याची इच्छा एका सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी व्यक्त केली. अशा संभाव्य खरेदीदारांनी यामागेचे तीन प्रमुख कारणे सांगितली आहेत. प्रथम, भाडे काळाबरोबर महाग होत चालले आहे. दुसरे, मालमत्ता खरेदी करणे अधिक लोकांच्या आवाक्यात आहे. तिसरे, भौतिक संपत्तीची मालकी त्यांना अधिक सुरक्षिततेची भावना देते. ४७ टक्के संभाव्य खरेदीदारांनी सांगितले की, व्याजदर आणि प्रॉपर्टीच्या किमतीत ज्या वेगाने वाढ होत आहे, ते पाहता घरांच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर जातील. गेल्या पाच वर्षात घरांच्या प्रति वर्गफूट सरासरी किमती बंगळुरूमध्ये ७%, मुंबईत ३.५%, आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ४% वाढल्या आहेत. रिअल इस्टेट मार्केटप्लेस नोब्रोक्ररच्या एका सर्वेक्षणनुसार ही माहिती समोर आली आहे.

२६ हजार लोकांवर केलेल्या सर्वेक्षणाचा ट्रेंड { २१% लोकांच्या मते, घरांच्या किमती वाढल्या आहेत. {१७% , व्याजदर वाढल्याने घर खरेदीचा विचार सोडून दिला. { २८% घरमालक असण्यापासून मिळणारी सुरक्षिततेची भावना त्यांना मालमत्ता खरेदी करण्यास प्रवृत्त करते. { ६७% घर खरेदी करताना त्यांच्यासाठी इमारतीचे बांधकाम गुणवत्ता महत्त्वाची राहील. { १ कोटीपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या किमती वाढल्या. { २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या किमती वाढल्या. { व्याजदर आणि किमतीत वाढ झाली असली तरी घर खरेदीदारांची भावना सकारात्मक आहे. जलद शहरीकरणामुळे, शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या वार्षिक आधारावर २% वाढली.

बातम्या आणखी आहेत...