आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:जुलै-सप्टेंबर तिमाहीत 78,000 लोकांना तात्पुरता रोजगार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात तात्पुरत्या रोजगार उद्योगात (फ्लेक्सी स्टाफिंग इंडस्ट्री) या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीत ७८ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. तो एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत ६% अधिक आहे. फ्लेक्सी स्टाफिंगचा अर्थ तात्पुरता रोजगार देणे किंवा एखाद्या प्रकल्पासाठी तात्पुरती कर्मचारी नियुक्ती करणे असा आहे. इंडियन स्टाफिंग फेडरेशन (आयएसएफ)च्या अहवालात म्हटले की, या वर्षी सप्टेंबर तिमाहीत आयटी क्षेत्र सोडले तर सामान्य क्षेत्र, दैनिक वापराच्या वस्तू (एफएमसीजी), ई-कॉमर्स, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, लॉजिस्टिक्स, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम, इन्शुरन्स, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागणी वाढल्याने नवीन नोकऱ्या ७.३% वाढल्या.

बातम्या आणखी आहेत...