आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. येत्या 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3-4 टक्के वाढ केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा वर्षातून दोन वेळा आढावा घेतला जातो.
मार्चमध्ये महागाई भत्ता 4 टक्के वाढला होता
केंद्र सरकारने मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला होता. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली होती. 4 टक्के वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढून 42 टक्के झाला आहे. याआधी सप्टेंबर 2022 मध्ये डीए 4 टक्के वाढवण्यात आला होता. जुलै 2022 पासून हा लागू करण्यात आला होता.
डीएमध्ये 3-4 टक्के वाढीची अपेक्षा
वृत्तांनुसार 7 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये 3-4 टक्के आणखी वाढीची अपेक्षा आहे. जुलैपासून हा लागू केला जाऊ शकतो. ताज्या माहितीनुसार सध्या केंद्र सरकारचे 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेंशनर्स आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो डीए
सरकारी कर्मचाऱ्यांना डीए दिला जातो. तर पेंशनर्सना डीआर दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आधारावर डीए दिला जातो. तर डीआर हा मूळ पेंशनच्या आधारे दिला जातो.
महागाई भत्ता काय असतो
वाढत्या महागाईनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा स्तर कायम राहावा यासाठी डीए दिला जातो. हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेंशनर्सना दिला जातो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.