आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीशांची वाढ:कोरोना लसीच्या कमाईतून जगात 9 अब्जाधीशांचा उदय

जिनेव्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपत्तीमध्ये 19.3 अब्ज डाॅलरने (1.41 लाख कोटी ) वाढ

कोरोनामुळे वर्षभरापासून संपूर्ण जग त्रस्त आहे. या काळात एकीकडे बहुतेकांना नुकसान सहन करावे लागले पण दुसऱ्या बाजूला काही जणांचे तर भाग्य फळफळले अाहेे. काेराेना लसीला परवानगी मिळाल्यानंतर झालेल्या नफ्यातून नऊ जण अब्जाधीश झाल्याचे पीपल्स व्हॅक्सिन अलायन्सने म्हटले अाहे. या लाेकांच्या संपत्तीमध्ये १९.३ अब्ज डाॅलरने (१.४१ लाख काेटी ) वाढ झाली असून त्यातून गरीब देशांना गरजेपेक्षा जास्त १.३ पट जास्त लसींचे डाेस मिळू शकतात.

द पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ हा विविध संघटना अाणि कार्यकर्त्यांचा गट अाहे जाे लसीच्या पेटंटचा अधिकार संपुष्टात अाणण्याची मागणी करत अाहे. सहयाेगींच्या मते या नव्या नऊ अब्जाधीशांशिवाय ८ विद्यमान अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये २.३५ लाख काेटींनी वाढ झाली अाहे.

माॅडर्ना फार्मास्युटिकलचे स्टीफन बॅन्सेल व बायोएंटेकच्या उगुर साहीन नव्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर अाहेत. ग्लोबल जस्टिस नाऊ या संस्थेच्या प्रमुख हायडी चाअाे म्हणाल्या, “ही लस करदात्यांच्या पैशाने बनली अाहे. काही लाेकांनी पैसे कमवावे अाणि कोट्यवधी लाेकांनी काेराेनाच्या विळख्यात सापडावे हे याेग्य नाही. भारतासारख्या देशात दररोज हजारो लोक मरत असल्याने या अब्जाधीश मालकांनी हिताला प्राधान्य दिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...