आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सेन्सेक्समध्ये 94 टक्के घसरण; निफ्टी 16,569 अंकांच्या खाली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजदर वाढीसंदर्भात रिझर्व्ह बँकेची या आठवड्यात हाेत असलेली बैठक तसेच कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि विदेशी निधी संस्थांनी कायम ठेवलेली विक्रीची भूमिका या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार केले. परिणामी सेन्सेक्स ९३.४१ अंकांनी घसरून ४४,६७५.३२ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्स दिवसभरात ४७३.४९ अंकांनी घसरून ५५,२९५.७४ अंकांच्या पातळीवर आला हाेता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक १४.७५ अंकांनी घसरून १६,५६९.५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.”संमिश्र आशियाई बाजारातील संमिश्र वातावरणामुळे भारतीय बाजार नकारात्मक पातळीवर उघडले. दुपारच्या सत्रात बाजाराने ताेटा भरून काढला. पण नंतर बाजारात तटस्थ व्यवहार झाले. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची बैठक हाेणार असून त्यापूर्वी बाजारात अनिश्चित वातावरण आहे, असे आनंद राठी शेअर्सचे इक्विटी रिसर्च प्रमुख नरेंद्र साेळंकी यांनी सांगितले.

सेन्सेक्स यादीतील एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, डॉ रेड्डीज, नेस्ले, लार्सन अँड टुब्राे, हिंदुस्तान युनिलिव्हर, आणि अॅक्सिस बँक यांना विक्रीचा फटका बसला. टाटा स्टील, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्र बँक या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...