आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हे रिपोर्ट:यंदा घरांच्या किमतीत 2.5% वाढ शक्य, पुढील वर्षी 4.5%, मालमत्ता विश्लेषकाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची मालमत्ता बाजारपेठ पुढील वर्षी वेग पकडेल. यामध्ये अर्थव्यवस्था महामारीच्या तडाख्यातून बाहेर पडणे आणि उदार पतधोरणांतर्गत कमी व्याजदराचे महत्त्वाचे योगदान असेल. रॉयटर्स वृत्तसंस्थेद्वारे मालमत्ता विश्लेषणावर केलेल्या एका पाहणीतून ही माहिती समोर आली. पाहणीत घर खरेदीची लोकांची क्षमता विभागलेली दिसली. ११ ते २४ ऑगस्टदरम्यान केलेल्या या पाहणीत या वर्षी देशभरात घरांच्या किमती सरासरी २.५% वेगाने वाढतील, असा अंदाज आहे.

तीन महिन्यांआधी सर्वेक्षणातील किमती सरासरी ०.७५% वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. भारतीय घरांच्या सरासरी किमती पुढील वर्षी २०२२ मध्ये ४.५% आणि २०२३ मध्ये ५.५% वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तोवर या महागाई दरापेक्षा पुढे निघेल. यात बिल्डर्ससाठी कच्च्या मालाचा खर्च वाढण्याचा अंशत: वाटा असेल. घरांच्या किमती वाढल्यास घर खरेदी करणाऱ्यांवर दबाव वाढू शकतो. कारण, अनेक लोक नाेकरी शोधताना झगडत आहेत व अर्थव्यवस्था कोरोना आधीच्या पातळीपर्यंत पोहोचली नाही.

कमी घरे, मोठ्या व्याजदराचा परिणाम होऊ शकतो
बांधकामाच्या वाढत्या खर्चाचा भार घर खरेदी करणाऱ्यांना उचलावा लागेल. घरांची कमी उपलब्धता व व्याजदरांत वाढ होणे यासारख्या कारणांमुळे लोकांच्या घर खरेदीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. - रमेश नायर, सीईओ, कोलियर्स इंडिया

घर खरेदीच्या क्षमतेवरून विश्लेषक विभागले
आगामी वर्षांत घर खरेदीच्या क्षमतेबाबत विश्लेषक विभागले. सर्व्हेत १३ पैकी सात जणांचे म्हणणे होते की, यामध्ये आगामी दोन-तीन वर्षांत सुधारणा दिसेल. अन्य स्थिती कायम राहील असे सांगितले.

घरांच्या मागणीत यामुळे होईल वाढ...
- व्याजदर कमी स्तरावर राहणे
- जॉब मार्केटमध्ये सुधारणा होत आहे
- अर्थव्यवस्थेने पुन्हा वेग पकडणे

बातम्या आणखी आहेत...