आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:बाजाराची धारणा नकारात्मक, मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत आणि एलआयसी आयपीओने वाढवलेली चिंता यामुळे भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली. आजच्या दिवसाची सुरूवातच घसरणीसह झाली. या घसरणीत सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स -839.41 अंक म्हणजेच -1.55% घसरणीसह 53,248.98 अंकाच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

मुंबई शेअर बाजाराची सुरूवातच घसरणीसह झाली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 53,608.35 अंकाच्या पातळीवर उघडला. काल दिवसभराच्या चढ उतारानंतर सेन्सेक्स 54,088.39 या पातळीवर बंद झाला होता.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरणीसह उघडले. मिडकॅप निर्देशांक 95 अंकांनी घसरून 22,045.24 वर उघडला. स्मॉलकॅप निर्देशांक 185 अंकांनी घसरून 25,310.31 वर उघडला.

शेअर्सचे आज वाटप
LIC च्या IPO गुंतवणुकीसाठी 9 मे पर्यंत खुला होता. आता IPO बंद झाल्यानंतर शेअर्सचे वाटप आज म्हणजेच 12 मे रोजी होणार आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की IPO मध्ये शेअर्स मिळाले आहेत की नाही. यानंतर, LIC चा IPO 17 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...