आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीसारखा दसरा:ग्राहकांच्या उत्साहाला उधाण; बाजारात आशेचे सीमोल्लंघन! सेन्सेक्स प्रथमच 61,000 वर

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजून दिवाळीची धामधूम सुरू व्हायची आहे, मात्र आर्थिक आघाडीवर आताच दिवाळीचा माहोल तयार झाला आहे. भारतीय ग्राहकांच्या भावनेत (कन्झ्युमर सेंटिमेंट) जुलैपासून सातत्याने वाढ होत ऑक्टोबरमध्ये त्यात ९.८ टक्क्यांची उसळी आली आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ८०% पेक्षा जास्त कुटुबांचे उत्पन्न वाढले. यंदाच नव्हे तर पुढील ५ वर्षे देशाची अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करणार असल्याचे भारतीयांचे मत आहे. जागतिक बँकेनेही त्यावर शिक्कामोर्तब करत सांगितले की, कोविड-१९ महामारीच्या तडाख्यात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था आता सावरण्याच्या स्थितीत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी खासगी संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्सनुसार, १० ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात कन्झ्युमर सेंटिमेंट ९.८% वाढला. यादरम्यान कन्झ्युमर एक्स्पेक्टेशन इंडेक्स म्हणजे ग्राहकांच्या आशेच्या निर्देशांकात १०.४% ची उसळी आली. कन्झ्युमर सेंटिमेंटमध्ये जुलैनंतर सातत्याने सुधारणा होत आहे. सप्टेंबरमध्ये कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स ७.९% वाढला. ऑगस्टमध्ये तो ही १.८% वाढ झाली. जुलैत ११.१% वाढ नोंद झाली होती. सीएमआयईनुसार, कन्झ्युमर सेंटिमेंटमध्ये तडाखेबंद उसळीमागे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था पुढील वर्षी तसेच आगामी ५ वर्षांत उत्तम कामगिरी करेल ही आशा आहे. सीएमआयईनुसार, बहुतांश कुटुंबांनी आपल्या कमाईत वाढ झाल्याची माहिती दिली आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये असा दावा करणाऱ्यांत ८०% वाढ झाली आहे.

अर्थव्यवस्थेतील तेजी या ४ सेक्टर्सद्वारे समजून घ्या
रिअल इस्टेट : विक्री २५% वाढीची आशा
मागील काही महिन्यांपासून विक्री सतत वाढत आहे. उत्सवकाळात यात तेजीची आशा आहे. क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहांच्या मते, उत्सवकाळात रिअल इस्टेट सेक्टरच्या विक्रीत २५% टक्क्यांची वाढ दिसून आली.

रिटेल : अनेक क्षेत्रांत प्री-कोविडपेक्षा पुढे
रिटेलर्स असो. ऑफ इंडियाच्या मते अनेक सेक्टर असे आहेत, ज्यात विक्री प्री-कोविडपेक्षा वाढली आहे. कन्झ्युमर गुड्सच्या विक्रीत सर्वाधिक २८% वाढ झाली. फूड अँड ग्रोसरी सेक्टरची विक्री २७% व क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटची विक्री १२% वाढली आहे.

ऑटो : मागणी जास्त, पुरवठा अजूनही कमी
ऑटोमोबाइल कंपन्यांची संघटना सियामच्या मते, सेक्टरमध्ये मागणीला कमी नाही, पण कंपन्या सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे मागणी पूर्ण करण्यात असमर्थ आहेत. उत्सवांदरम्यान प्रतीक्षा कालावधी आणखी लांबण्याची शक्यता आहे.

ज्वेलरी : प्री-कोविड पेक्षा १५% जास्त विक्री
वर्ल्ड गोल्ड काैन्सिलच्या मते ऑक्टोबर ते डिसेंबर भारतात २२३.१ टन सोन्याची विक्री होऊ शकते. ती प्री-काेविडपेक्षा १५% अधिक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असो. चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, मागील वर्षीपेक्षा तिपटीने विक्री वाढली.

जागतिक बँकेने मान्य केले-भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय : जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटले की, कोविडच्या विळख्यात अडकलेली भारतीय अर्थव्यवस्था संकटातून सावरण्याच्या स्थितीत आहे. संघटित क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत अधिक लोकांना एकीकृत करणे आणि लोकांचे उत्पन्न वाढवण्याच्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यात भारताने प्रगती केली आहे. आणखी प्रयत्नांची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...