आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेअर बाजारात गुरुवारी चढ-उतारादरम्यान निर्देशांकाची चार दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली. बीएसई १६० अंकांच्या वाढीसह ६२,५७१ अंकांवर बंद झाला. निफ्टीत ४९ अंकांची वाढ झाली. तो १८,६०९ अंकावर स्थिरावला. व्यावसायिकांच्या मते जागतिक स्तरावरील निवडक बँका आणि ऑटो शेअरमुळे बाजारात तेजी राहिली. दरम्यान, हिमाचल प्रदेशात पराभवानंतर गुजरातेतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या विक्रमी विजयामुळे बाजारात तेजी आली. मात्र विदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर विक्रीमुळे बाजाराच्या उसळीला विराम लागला. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणुकदारांनी गुरुवारी भारतीय शेअर बाजारातून १,२२६.८४ कोटी रुपये काढले. त्याशिवाय साप्ताहिक एफअँडओ सौद्यांची एक्सपायरी पाहता काही गुंतवणूकदार बाजारापासून लांब राहिले. त्यामुळेही वाढीला अंकुश लागला. जाणकारांच्या मते, विक्रमी उंची गाठल्यानंतर शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.