आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅगॉन लाइफची आय गॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज तुम्हाला हमीपात्र करमुक्त परताव्यासोबत इतरही अनेक सुविधा प्रदान करते. आयगॅरंटी योजना ६.२४% पर्यंत परतावा मिळवून देते. तो बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीच्या ऑफरइतकाच असू शकतो. मात्र एखाद्या बँकेच्या विपरीत ज्या परताव्यावर कर आकारला जातो त्या तुलनेत आयगॅरंटीचा परतावा हा १००% करमुक्त असतो. यामुळे जी रक्कम आपण व्याजासोबत वाचवली होती, ज्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आले होते, ती पूर्ण रक्कम तुमच्या हाती येते. ही अत्यंत परवडणारी योजना आहे.
अनेक बचत उत्पादनांसाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याची गरज असते. त्याउलट आयगॅरंटीमुळे आपल्यापैकी बरेचसे लोक कमी पैशांतच गुंतवणूक करू शकतात. ही योजना तुम्हाला अवघ्या दरमहा ५०० रुपयांतच बचत सुरू करण्याची सुविधा मिळवून देते. ही कोणत्याही बचत योजनेद्वारे प्रदान करण्यात येणारी सर्वात किमान रक्कम आहे, हे विशेष! ही योजना किफायतशीर असून ती सर्वच गटांतील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
भविष्यातील तरतुदींसाठी एक जीवन विमा पॉलिसी घेणे श्रेयस्कर आहे. दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणांत पॉलिसीधारकाच्या वारसांना एकरकमी करमुक्त रक्कम मिळेल याची शाश्वती असते. पॉलिसीधारकाच्या कुटुबीयांना ५ लाख रुपये देण्यात येतात. ही रक्कम त्याच्या वार्षिक प्रीमियमच्या जवळपास ११ पट आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी बचत करण्याचे उद्दिष्ट यातून साध्य केले जाऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.