आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • A Policy Of Rs 5 Lakh May Not Cover Rs 50,000, Limiting The Liability Of The Insurance Company | Marathi News

विम्याची गोष्ट:5 लाखांच्या पॉलिसीत 50 हजार खर्च समाविष्ट नसणे शक्य आहे, विमा कंपनीच्या जबाबदाऱ्या मर्यादित करतात सबलिमिट

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबलिमिट म्हणजे एकूण विम्याच्या रकमेतील विविध रोगांच्या उपचारांवर होणाऱ्या खर्चाची मर्यादा. ही मर्यादा रुपयांमध्ये असते, परंतु टक्केवारीतही असू शकते. उदा. तुमचे वैद्यकीय विमा स्टेटमेंट एखाद्या विशिष्ट रोगासाठी ३९,००० रुपयांची सबलिमिट निर्दिष्ट करू शकते. अन्य पॉलिसीमध्ये, ही सबलिमिट विम्याच्या रकमेच्या १% किंवा ५% असू शकते. आजाराव्यतिरिक्त तपासणी खर्चासारख्या काही खास लाभांसाठी सबलिमिट देखील असू शकतात. सबलिमिट विमा कंपनीच्या दायित्वावर मर्यादा घालते, जरी विम्याची रक्कम सबलिमिटपेक्षा खूप जास्त असली तरीही. उदाहरणार्थ,जर तुमच्या पॉलिसीची विम्याची रक्कम ५ लाख रुपये असेल व एखाद्या विशिष्ट रोगाच्या उपचारासाठी उपमर्यादा ५०,००० रुपये असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या रोगावरील उपचाराचा खर्च कव्हर करण्याच्या बाबतीत तुमच्या विमाकर्त्याची जबाबदारी ५०,००० रुपयांपर्यंत मर्यादित आहे. वरील खर्च पॉलिसीधारकाला स्वतः सहन करावा लागेल.

तीन प्रकारची असते सब-लिमिट

1. आजारांवर सबलिमिट सबलिमिट मोतीबिंदू, मूत्रपिंड , मूळव्याध, गुडघ्याची समस्या, टॉन्सिल, सायनस यासारख्या सामान्य आजारांसाठी लागू केली जाते. सबलिमिटअंतर्गत येणाऱ्या रोगांची यादी कंपनीनुसार भिन्न असू शकते. आरोग्य विमा घेण्यापूर्वी, ही यादी काळजीपूर्वक पाहा. यादी लहान असेल असा आरोग्य विमा निवडा. 2. लाभांवर सबलिमिट अशा सबलिमिटच्या यादीमध्ये सामान्यतः खोलीचे भाडे शुल्क, आयसीयू शुल्क, रुग्णवाहिका शुल्क, आेपीडी खर्च आणि घरातील उपचार खर्च यासारख्या कव्हरचा समावेश असतो. जर तुम्ही खोलीच्या भाड्याने जोडलेल्या सबलिमिटेसह आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल, तर याचा अर्थ रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्याचा खर्च सबलिमिटप्रमाणेच कव्हर केला जाईल. सहसा ते टक्केवारीत असते. उदाहरणार्थ, समजा तुमच्या ५ लाख रुपयांच्या पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची सबलिमिटा २ % आहे, तर विमा कंपनी फक्त १०, ००० पर्यंतच्या खोलीच्या भाड्याची किंमत कव्हर करेल. 3. हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चावर सबलिमिट अॅडमिट हाेण्यापूर्वीच्या वैद्यकीय तपासणी आणि एक्स-रे यांसारखे सर्व खर्च प्री-हॉस्पिटलायझेशन खर्चाच्या अंतर्गत येतात. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोस्ट-डिस्चार्ज चाचण्या, औषधे, सल्लामसलत शुल्क इ. हॉस्पिटलायझेशन नंतरचे खर्च आहेत. यासाठीही सबलिमिट आहेत. ही मर्यादा ३० ते ९० दिवसांपर्यंत असू शकते. म्हणजेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतरची सब-लिमिट ४५ दिवसांची आहे, त्यानंतर रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ४५ दिवसांचा उपचाराचा खर्च विमा कंपनी उचलेल.

टी. ए. रामलिंगम मुख्य तांत्रिक अधिकारी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स

बातम्या आणखी आहेत...