आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी संकलन:मार्चमध्ये विक्रमी 1.42 लाख कोटी जीएसटी संकलन, वार्षिक आधारावर 14.7% व कोविड पूर्वच्या तुलनेत 33.3% जास्त; मार्च 21 मध्ये 1.24 लाख कोटी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे निर्बंध दूर होण्याबरोबरच मार्चमध्ये विक्रमी जीएसटी संकलन झाले आहे. मार्चमध्ये १,४२.०९५ कोटी रुपयांचे संकलन झाले असून ते फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ६.८% आणि एक वर्ष आधीच्या तुलनेत १४.७ % आहे, तर कोरोनापूर्व म्हणजे मार्च २०१९ च्या तुलनेत ३३.३ % जास्त अाहे.फेब्रुवारी २०२२ मध्ये १,३३,०२६ कोटी रुपये, मार्च २०२१ मध्ये १,२३,९०२ कोटी रुपये आणि मार्च २०१९ मध्ये १,०६,५७७ कोटी रुपये संकलन झाले होते. या वर्षी जानेवारीमध्ये जीएसटीचे विक्रमी संकलन १,४०,९८६ कोटी रुपये होते. मार्चच्या विक्रमी संकलनात सीजीएसटीअंतर्गत २५,८३० कोटी रुपये, राज्य जीएसटीसाठी ३२,३७८ कोटी , आयजीएसटीसाठी ७४,४७० कोटी व उपकरात मालाच्या आयातीवर ९८१ कोटी जीएसटी प्राप्त झाला आहे.

जीएसटी संकलन करणाऱ्या अव्वल ५ राज्यांत महाराष्ट्र

राज्य मार्च २१ मार्च २२ वाढ महाराष्ट्र १७,०३८ २०,३०५ १९% गुजरात ८,१९७ ९,१५८ १२% कर्नाटक ७,९१५ ८,७५० ११% तामिळनाडू ७,५७९ ८,०२३ ६% हरियाणा ५,७१० ६,६५४ १७%

प्रत्यक्ष कराचे विक्रमी निव्वळ संकलन
आर्थिक वर्ष प्रत्यक्ष कर संकलन

२०१८- १९ ११.१८
२०१९- २० १०.२८
२०२०-२१ ९.१८
२०२१-२२ १३.६३
(आकडे लाख कोटी रुपयांत)

बातम्या आणखी आहेत...