आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेंड:देशाचा जीडीपी उणे असला तरी उद्योगपतींचा उत्साह शिखरावर, देशात दरमहा विक्रमी 16 हजार नव्या कंपन्यांची नोंदणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील जास्त, यापूर्वी सेवा क्षेत्रातील जास्त असायच्या

देशाचा जीडीपी भलेही उणे असला तरी उद्योगपतींचा उत्साह शिखरावर आहे. केंद्र सरकारच्या आकड्यांनुसार, जुलै ते ऑक्टोबरपर्यंत दर महिन्याला १६ हजारपेक्षा जास्त कंपन्या स्थापन झाल्या. यापूर्वी कधीही एका महिन्यात १४ हजारपेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झाली नव्हती. ऑक्टोबरमध्ये १६,६०७ कंपन्या स्थापन झाल्या, हा विक्रम आहे. विशेष म्हणजे नव्या कंपन्यांत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा जास्त आहे. सध्या देशात बिझनेस सर्व्हिस क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा ३२% आणि मॅन्युफॅक्चरिंगचा २०% आहे. पण नव्या कंपन्यांत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा २२ ते २३% आहे, तर बिझनेस सर्व्हिस क्षेत्राचा वाटा घटून २८ ते २९% वर आला आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण ४० : १५ असे राहत होते.

कारण : कॉर्पोरेट टॅक्स कमी आणि पीएलआय

कंपनी व्यवहारातील तज्ज्ञ निपुण सिंघवी म्हणाले की, नव्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना फक्त १५% कॉर्पोरेट टॅक्स लागत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांमार्फत व्यवसाय करणारे लोकही कंपनी स्थापन करून व्यवसाय करू इच्छितात. पीएलआय योजनेचा परिणामही दिसत आहे.

> पीएचडी चेंबर्स ऑफ काॅमर्सचे प्रमुख अर्थतज्ज्ञ डॉ. एस. पी. शर्मांनी सांगितले की, सरकार नव्या सुधारणा करत आहे, त्यापैकी बहुतांश नवे उद्योग आणि एमएमएमईसाठी आहेत. त्यामुळे ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, ते कंपन्यांची नोंदणी करत आहेत. कंपन्यांची नोंदणी करणाऱ्यांत विदेशातून परतलेले लोकही आहेत, कारण येथे व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत.

बातम्या आणखी आहेत...