आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • ABHA Health Card; ABHA Card Benefits | Online Apply Process | All You Need To Know

काय असते 'आभा' हेल्थ कार्ड:याचा नेमका काय होतो फायदा, ऑनलाईन ABHA कार्ड कसे काढणार; जाणून घ्या सविस्तर

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असते. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतो. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. चला तर आज जाणून घेवूया, आभा हेल्थ कार्ड नेमकं काय असते. त्याचा काय फायदा होतो, ते कसे मिळवायचे, ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवता येईल.

आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय :

 • आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
 • हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
 • यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल

ABHA हेल्थ कार्डचे हे आहेत फायदे :
तुम्ही नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यास, तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही.
तुमचा रक्तगट कोणता आहे, तुम्हाला कोणता आजार झाला आहे, सोबत तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेला होता. ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल.
तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि प्रयोगशाळेतील अहवालांची माहिती आभा कार्डमध्ये राहील.
ऑनलाइन उपचार घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल, ते आभा कार्ड दाखवून ऑनलाइन डॉक्टरांना सर्व माहिती सहज देऊ शकतात.
आभा हेल्थ कार्ड विमा कंपन्यांशी जोडले गेले आहे. ज्याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणे देखील सोपे होईल.
तुमच्या मेडिकल स्लिप्स, रिपोर्ट्स इत्यादी गहाळ होण्याची भीती राहणार नाही. तुम्ही सहजपणे तुमचे रेकॉर्ड ऑनलाइन ठेवू शकाल.

तुम्ही घरबसल्या बनवू शकता आभा हेल्थ कार्ड

 • यासाठी सगळ्यात आधी https://ndhm.gov.in/ असं सर्च करा
 • त्यानंतर 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
 • इथल्या Create ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.
 • इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
 • आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे. तशी सूचना इथं दिलेली असेल. मग next या पर्यायावर जा.
 • सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.
 • सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग नेक्स्टवर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून पुढे जा.
 • पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल.
 • Aadhaar Authentication Successful झाल्याचीही सूचना तिथे येईल. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे.
 • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मग next वर क्लिक करायचं आहे.
 • तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेसही आभा क्रमांकाशी जोडू शकता.
 • आता स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करा.
 • इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे.
 • खालच्या रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा अ‌ॅड्रेस तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करा.
 • तुमचा आभा नंबर आभा अॅड्रेस लिंक झाल्याचा मेसेज स्क्रिनवर येईल. ​​​​​​​

आभा कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स​​​​​​​
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मोबाईल नंबर

ABHA साठी अॅप आहे का
होय, तुम्ही प्ले स्टोअरवरून ABHA अॅप डाउनलोड करू शकता. या अॅपचे पूर्वीचे नाव एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड होते.

ABHA CARD मधून वैद्यकीय इतिहास कसा काढायचा
प्रत्येक आभा हेल्थ कार्डवर 14 अंकी युनिक आयडी क्रमांक उपलब्ध असेल आणि एक QR कोड उपलब्ध असेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा वैद्यकीय इतिहास काढू शकता.

गोपनीयतेसाठी आभा कार्डमध्ये काय सुविधा
आभा कार्ड बनवून तुमची हिस्ट्री कोणाकडेही जाण्याची भीती आहे. असा विचार करत असाल तर तसे अजिबात नाही. गोपनीयतेसाठी सरकारनेही एक चांगलं पाऊल उचललं आहे. तुमच्या संमतीशिवाय तुमचा मेडिकल हिस्ट्री कोणीही जाणून घेऊ शकत नाही. कारण जो मोबाईल क्रमांक आभा हेल्थ कार्डसाठी दिलेला आहे. त्यावर लागलीच OTP येतो. ज्याद्वारे तुमच्या कार्ड वापरासंबंधी संमती विचारली जाईल.

आयुष्यमान कार्ड आणि आभा हेल्थ कार्ड यामध्ये काय फरक आहे- जाणून घ्या

आयुष्यमान कार्ड हे हेल्थ इंश्युरन्स आहे.आभा कार्ड हे डिजीटल हेल्थ अकाऊंट आहे.
हे कार्ड फक्त विशिष्ट वर्गांसाठी आहे, गरीब कुटुंबातील लोकांसाठीआभा कार्ड देशातील कोणताही व्यक्ती बनवू शकतो.
उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी उपयुक्तउपचारादरम्यान वैद्यकीय हिस्ट्री समजून घेण्यासाठी
शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे कार्ड बनविण्याचा नियमयाला कोणताही नियम लागू नाही