आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Able To Pay 40% Installment Of Moratorium; 34% Took A Discount Out Of Fear Of A Job

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वेक्षण:मोरॅटोरियमचे 40% हप्ता भरण्यात सक्षम; 34% नी नोकरीच्या भीतीतून घेतली सूट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पैसाबाजार डॉटकॉमने जाणून घेतल्या ईएमआय फेडणाऱ्या लोकांच्या योजना

लॉकडाऊनमुळे मोरॅटोरियम (तात्पुरती हप्ता स्थगिती सूट)सुविधा घेणाऱ्या ३४ टक्के नोकरदार लोकांनी भविष्यात नोकरी गमावणे किंवा वेतन कमी होण्याच्या भीतीतून ही सूट घेतली होती. त्यांच्या उत्पन्नात कोणतीही घट झाली नव्हती. दुसरीकडे, मोरॅटोरियमचा फायदा घेणारे ४० टक्के लोक या महिन्यापासून ईएमआय देण्यास सक्षम आहेत. पैसाबाजार डॉटकॉमच्या एका सर्वेक्षणात हे वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार, ज्या ग्राहकांनी मोरॅटोरियम घेतले होते त्यांच्यापैकी एका मोठ्या वर्गाच्या उत्पन्नावर परिणाम झाला नाही आणि त्यांच्याकडे हप्ता भरण्याची क्षमता आहे.

२३% लोकांनी सांगितले की, मोरॅटोरियमचा फायदा उचलला आहे, मात्र हेही सांगितले की, या अवधीदरम्यान त्यांच्या उत्पन्नात कोणतीही घट आली नाही. असे करणाऱ्या नोकरदार लोकांची संख्या ३४ टक्के आहे. विशेष म्हणजे एक लाख रुपयांच्या ३५ पेक्षा जास्त शहरांत २४ वर्षे ते ५७ दरम्यानच्या ८५०० हून जास्त ग्राहकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. पैसाबाजार डॉटकॉमचे सीईओ नवीन कुकरेजा म्हणाले की, अर्थव्यवस्थेत सुधारणेसह उत्पन्नही वाढत आहे.

७० टक्क्यांनी सांगितले, कर्ज पुनर्गठणासाठी अर्ज करू

सर्वेक्षणात सहभागी निम्म्यापेक्षा जास्त ग्राहकांनी सांगितले की, कर्ज पुनर्गठन योजनेसाठी आपली बँक/ कर्ज संस्थेशी संपर्क करू इच्छितात.

८६ टक्के स्वयंरोजगार करणाऱ्यांना नुकसान

स्वयंरोजगार ग्राहकांपैकी ८६% नी निर्बंधामुळे उत्पन्नात नुकसानीची माहिती दिली. २५ टक्क्यांचे उत्पन्न शून्य झाले आहे. नोकरदार ग्राहकांवर कमी परंतु तरीही महत्त्वाचा परिणाम झाला आहे. ५६% नोकरदार ग्राहकांनी सांगितले की, महामारी आणि टाळेबंदीमुळे त्यांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. १२% नी सांगितले की, त्यांनी आपली नोकरी गमावली आहे आणि सध्या काेणतेही उत्पन्नाचे साधन नाही.

चेन्नईत नकारात्मक परिणाम कमी, दिल्ली-मुंबईत जास्त

सर्वेक्षणानुसार, दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये लोकांच्या उत्पन्नावर आणि हप्ता भरण्याच्या क्षमतेवर जास्त परिणाम झाला. चेन्नईत सर्वात कमी परिणाम झाला होता. चेन्नईत सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या ४८% पेक्षा जास्त ग्राहकांनी सांगितले की, त्यांच्यावर आरोग्य संकट आणि लॉकडाऊनमुळे कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. चेन्नईत केवळ ९% नागरिकांनी १००% उत्पन्नाचे नुकसान झाले. दिल्ली एनसीआरच्या ७०% रहिवाशांनी उत्पन्न घटल्याची माहिती दिली. यातील एनसीआरच्या १६% ग्राहकांनीही सांगितले की, टाळेबंदीमुळे त्यांचे उत्पन्न शून्य झाले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser