आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्या विषयी:आपली गरज आणि कमाई पाहून विकत घ्या विमा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही प्रकारचा वीमा विकत घेण्याआधी आपली गरज आणि कमाई पाहणे गरजेचे आहे. बहुतांश लोक एजंट किंवा आकर्षक जाहिरातींच्या नावाखाली अनावश्यक विमा खरेदी करतात आणि त्यांच्या खिशावर बोजा वाढतो. येथे साधारणपणे कोणत्या प्रकारच्या विम्यासाठी किती खर्च येतो आणि सरासरी उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम कोणत्या विम्यावर खर्च करावी लागते जाणून घ्या...

मुदत जीवन विमा जीवन विमा संरक्षण उत्पन्नापेक्षा १० किंवा १२ पट जास्त घेतले पाहिजे. ३० वर्षांच्या नॉन-स्मोकरसाठी टर्म इन्शुरन्सचा वार्षिक प्रीमियम १०,००० ते १२,००० पर्यंत असू शकतो. धुम्रपान, वय, पूर्वीपासून अस्तित्वात असलेले रोग यासारखे घटक जोडल्यास ते २५ ते ३० हजार रुपये असू शकते. सरासरी, उत्पन्नाच्या २.५-३% टर्म लाइफ प्रीमियमवर खर्च करणे आवश्यक आहे.

आरोग्य विमा ३० वर्षाच्या दाम्पत्यांसाठी भारतात ५ लाख कव्हरचा मानक आरोग्य विम्याचा प्रीमियम १० ते १२ हजार रुपये वार्षिक म्हणजे ८०० ते १००० रुपये महिना असतो. यात जोखिम सुरक्षितता, अॅड-ऑन फायदे, विम्याच्या रकमेवर अवलंबून वाढू शकतात. उत्पन्नाच्या ४-५% रक्कम आरोग्य विमा प्रीमियमवर खर्च करावी. सामान्य विमा या अंतर्गत मोटार विमा, गृह विमा, सायबर संरक्षण, प्रवास विमा, इलेक्ट्रिक वस्तू किंवा इतर मौल्यवान वस्तूंचा विमा येतो. त्या वस्तूचे नुकसान, चोरी किंवा झीज झाल्यामुळे आर्थिक नुकसानीच्या आधारावर विमा घेतला जाऊ शकतो. परंतु सरासरी आपल्या उत्पन्नाच्या ३-४% सामान्य विम्यावर खर्च करणे योग्य आहे.

बातम्या आणखी आहेत...