आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया महिन्यात आणि त्यानंतर एसी, फ्रिज, टीव्हीसारखे होम अप्लायन्सेस खरेदी करणे ४-५% महाग पडू शकते. एसी, फ्रिजसारख्या कूलिंग प्रॉडक्ट्सशिवाय मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशरसारख्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सच्या किमतीही ६ महिन्यांत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. व्हाइट गुड्स उद्योगाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, ६ महिन्यांत पोलाद, तांब्यासारख्या कच्च्या मालाच्या किमती २०-२१ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. याआधी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढल्या होत्या. यंदा पहिल्या सहामाहीत होम अप्लायन्सेसच्या किमती १२% पर्यंत वाढल्या आहेत आणि आताही ७-८% वाढीची शक्यता आहे. जुलैमध्ये ३-५% वाढ पाहायला मिळू शकते. अनेक कंपन्यांनी उत्पादनाच्या किमती एकदाच वाढण्याऐवजी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थोड्या-थोड्या वाढवण्याची योजना आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अंड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे(सीएमा) अध्यक्ष व गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी यांच्याानुसार, कमोडिटीच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, काहीशी गुंतवणूक वाढल्यामुळे कूलिंग प्रॉडक्ट्स व होम अप्लायन्सेच्या किमती वाढवण्याचा उद्योगांना नाइलाज झाला आहे.
कोराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विक्रीवर परिणाम
वर्षातील सुरुवातीचे तीन महिने चांगले गेल्यानंतर एप्रिल-जून व्हाइट गुड्स उद्योगासाठी योग्य राहिले नाहीत. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात स्थानिक पातळीवर लॉकडाऊन राहिला आणि उन्हाळ्यात पीक सीझनमध्येही एसी, फ्रिजची विक्री होऊ शकली नाही. सिएमाच्या सूत्रांनुसार, एप्रिलमध्ये होम अप्लायन्सेसची विक्री निम्मी झाली. मेमध्ये विक्री झाली नाही आणि जूनमध्ये जवळपास ७०% विक्री झाली. आता मान्सून आला आहे. परिणामी कूलिंग श्रेणीत विक्रीची जास्त अपेक्षा नाही.
किंमत वाढवण्याचा नाइलाज
स्टील, तांबे, अॅल्युमिनियमच्या किमती वाढल्याने होम अप्लायन्सेस कंपन्यांना किमती वाढवाव्या लागत आहेत. किमती तीन महिन्यांत थोड्या-थोड्या वाढतील.- कमल नंदी, अध्यक्ष, कंझ्यु. इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
उत्पादन खर्च वाढला
वाढत्या गुंतवणुकीमुळे एसी,फ्रिजच्या किमती जुलैमध्ये ४-५% वाढल्या.कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे व्हाइट गुड्सचा उत्पादन खर्चही वाढला. - मनीष शर्मा, अध्यक्ष आणि सीईओ, पॅनासोनिक इंडिया आणि द. आशिया
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.