आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फायनान्स फंडा:निवृत्तीनंतर स्वीकारा बचत रोखे आणि एससीएसएसचा मार्ग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँकांची मुदत जमा दर एका वर्षात बराच घटला

रिटायरमेंटनंतरचा काळ खूप वैशिष्टपूर्ण असतो. आता तुम्ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यातील विविध बंधनातून मुक्त झालेले असता आणि आपला वेळ कुटंुबासोबत घालवू शकता. तुम्ही या काळात एखादा छंद जाेपासू शकता. मात्र, सुखकर निवृत्ती जीवनासाठी नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. बचत किती करायची आणि कुठे करायची हे कळायला पाहिजे. हे उदाहरणासह समजून घेऊ.

६० वर्षीय मनोहर शेट्टी चेन्नईत आपल्या घरी पत्नीसह राहतात. ते गेल्या महिन्यात निवृत्त झाले. बँकांच्या नव्या मुदत जमा रकमेवरील दरांत एका वर्षात मोठी घसरण आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सरासरी ६% व्याज मिळत आहे. मनोहर आतापर्यंत प्राप्त ग्रॅच्युइटी+पीएफचे पैसे आणि आतापर्यंतच्या बचतीतून निवृत्ती जीवनाची योजना कशी आखतील? त्यांचा मासिक खर्च ५० हजार रुपये आहे. त्वरित गणनेतून लक्षात येते की, येत्या २५ वर्षांपर्यंत ५० हजाराच्या मासिक उत्पन्नासाठी ७.५% करमुक्त परतावा देण्याची गरज असेल. यामध्ये ५% च्या अंदाजित महागाईचा समावेश केल्यास, काही वर्षांनंतर त्यांच्यासाठी ५५ हजार रुपये हवेत. त्यानंतर काही वर्षांनंतर ६० हजार रुपये. ही रक्कम सतत वाढत जाईल. नियोजनात या पैलूचा समावेश करा.

एससीएसएस : ७.५% व्याज, १.५ लाखापर्यंत करमुक्त

• आरोग्य विम्यात कव्हर केला जाऊ शकत नाही,असा तुमचा पारंपरिक १५ लाखाचा कोश वेगळा ठेवा

• ३ पैकी एका योजनेची निवड करू शकतो. ते एससीएसएस व बचत बाँडमधून व्याज घेऊ शकतात. म्युच्युअल फंडातून सिस्टमेटिक विथड्रॉल सुरू करू शकता.

• एससीएसएसमध्ये ७.४%चे व्याज दर आहे. १.५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त.

• भारत सरकार ७.७५% बचत रोखे, २०१८ ही चांगला पर्याय होऊ शकतो. याबाबत कमी लोकांना माहिती आहे.

• एससीएसएसमध्ये ५ वर्षाचा परिपक्वता अवधी आहे व बचत रोखे ७ वर्षाच्या लॉक-इनसह येतात, त्यामुळे आम्ही बॅलेेन्स्ड अॅडव्हांटेज म्युच्युअल फंडात तरतुदीची शिफारस केली. जी तरलता+वृद्धी+ उत्कृष्ट कराधान देईल.

खालील स्लॅबमध्ये येण्यासाठी पती-पत्नीतील गुंतवणूक समान वाटप

एससीएसएस परिपक्व झाल्यावर ३ वर्षासाठी वाढवा. लक्षात ठेवा, यासाठी पक्वतेच्या एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. बाँडमध्ये ७ वर्षांचा लॉक इन परियड असतो. याची मुदत संपल्यानंतर त्यावेळच्या दराच्या हिशेबाने ठरवा की यामध्ये कायम राहावे की नव्या पर्यायात गुंतवणूक करायाची.

चिंतन शहा

फायनांशियल प्लॅनर, एटिका वेल्थ मॅनेजमेंट

बातम्या आणखी आहेत...