आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका अहवालानुसार, विशेषत: उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये अधिक सकारात्मक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनामुळे देशातील कंपन्यांमध्ये यावर्षी सरासरी ९ टक्के वेतनवाढ देण्याची शक्यता आहे.
मायकेल पेज सॅलरी अहवाल २०२२ नुसार, २०२२ मध्ये सामान्य पगारवाढ २०१९ च्या महामारीपूर्व वर्षातील ७ टक्क्यांच्या तुलनेत ९ टक्के होणार आहे. स्टार्टअप्स आणि नवीन-युगातील कॉर्पोरेशन्स, युनिकॉर्नसह एकत्रितपणे साधारणपणे अंदाजे १२ टक्क्यांच्या वाढीचा कल ठेवतील असे यात म्हटले आहे. वाढीच्या क्षेत्रांमध्ये बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योग, मालमत्ता आणि बांधकाम तसेच उत्पादन यांचा समावेश आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काॅम्प्युटर सायन्सची पार्श्वभूमी असलेले वरिष्ठ स्तरावरील व्यावसायिक भारतातील काही सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांसाठी वाटाघाटी करण्यासाठी चांगल्या स्थितीत असतील. ई-कॉमर्स आणि इतर क्षेत्रांच्या वाढीमुळे डिजिटल परिवर्तन होत आहे, असे त्यात नमूद केले आहे. मायकेल पेज सॅलरी अहवाल हा भारतातील त्यांच्या मालकीच्या डेटा आणि नेटवर्कमधून मिळवलेल्या माहितीवर आणि तथ्यांवर आधारित आहे. यात २०२१ मध्ये दिलेल्या नोकरीच्या जाहिराती आणि प्लेसमेंटचा समावेश आहे, .
वेब डेव्हलपर आणि क्लाऊड आर्किटेक्ट यांना मागणी
विशेषत:वेब डेव्हलपर आणि क्लाउड आर्किटेक्ट यांना जास्त मागणी विशेषत: जर त्यांच्याकडे उच्च दर्जाच्या विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर असे अहवालात म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.