आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय घोडावत ग्रुपची (एसजीजी) एफएमसीजी शाखा घोडावत कंझ्युमर लिमिटेडने (जीसीएल) मुंबईस्थित कूलबर्ग स्टार्टअप विकत घेतले आहे. ते माल्ट-आधारित लज्जतदार नॉन अल्कोहोलिक बिअर ऑफर करतात. २०१६ मध्ये पंकज असवाणी व याशिका केसवाणी यांनी स्थापन केलेले कूलबर्ग हे भारतातील माल्ट-आधारित नॉन अल्कोहोलिक बिअरचे प्रणेते आहेत. २०० हून अधिक शहरांमध्ये आणि १० देशांमध्ये त्याचे वितरण वाढवले आहे.
२०१३ मध्ये स्थापन झालेल्या जीसीएलने सतत उत्पादनात नावीन्यता आणून ग्राहकाभिमूख, माफक दर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. यातून त्यांनी स्वतःची एक अद्वितीय ब्रँड म्हणून ओळख निर्माण केली आहे. जीसीएलने अलीकडेच २०२२ मध्ये महसुलात १,४०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला असून २०२३ पर्यंत तो २,००० कोटी रुपयांवर जाऊ शकतो. कूलबर्ग जीसीएलच्या इंपल्स विभागाचा भाग बनेल आणि जगभरात त्याच्या श्रेणीतील सर्वात मोठा ब्रँड बनण्याचे उद्दिष्ट आहे. कूलबर्गची संपूर्ण टीम जीसीएलमध्ये सामील हाेऊन प्रीमियम पेय ब्रँड्सचा पोर्टफोलिओ विकसित करण्याच्या लक्ष्याकडे वाटचाल करेल. जीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, “कूलबर्गमधील आमची गुंतवणूक ही जागतिक स्तरावर जीवनमान वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. ग्राहकांनी दिवसभरात जीसीएलचे किमान एक उत्पादन वापरावे हे आमचे ध्येय आहे. आम्ही कूलबर्गच्या अत्यंत अनुभवी टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.” कूलबर्गची सह-संस्थापिका याशिका केसवाणी म्हणाल्या, “कूलबर्ग हा एक जीवनशैली ब्रँड आहे ज्याने त्याच्या ग्राहकांमध्ये एक मजबूत निष्ठा निर्माण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.