आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून संकटांत सापडलेल्या अदानी समूहाने आपल्या काही कंपन्यांची कार्यालये मुंबईहून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील महत्त्वाच्या विभागांचे कामकाज आता अहमदाबाहून सुरू झाले आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 6.5 अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज अहमदाबादहून होत आहे.
कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती कंपनीची झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. या ्रासाला कंटाळून अनेक जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, अशी देखील चर्चा आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वाढला ताण
कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज दोन शहरांमध्ये विभागले गेल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. यामुळे अनेकांनी अन्य संधींचा शोध सुरू केला आहे. ACC आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडील रिक्त जागांची विचारणा करीत असल्याचे दिसत आहे. दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे 10 हजार मनुष्यबळ मुंबईत कार्यरत आहे. ACCमध्ये सहा हजार तर अंबुजा सिमेंटमध्ये 4,700 कर्मचारी आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
हे ही वाचा
'हिंडेनबर्ग'ने आधीही अनेक कंपन्यांना कंगाल केले आहे:कोण आहेत याचे मालक? जे आता अदानींच्या मागे लागलेत
25 जानेवारी रोजी अमेरिकेतील 'हिंडेनबर्ग' कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालाचे शीर्षक आहे. 'जगातील तिसरा श्रीमंत माणूस कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक कशी करत आहे' - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.