आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज:अदानी समूह घेतोय परदेशातून  35 हजार कोटी रुपयांचे कर्ज

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूह ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा (४५० काेटी डाॅलर) जास्त भांडवल उभारण्यासाठी डझनभर विदेशी बँकांशी बोलणी करत आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह यात यशस्वी झाला, तर भारतीय कॉर्पोरेट समूहाने विदेशी चलनात घेतलेले हे सर्वात मोठे कर्ज असेल. अदानी समूह अशा वेळी पैसा उभारण्याचा प्रयत्न करत आहे, जेव्हा त्याने अलीकडेच जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सिमचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याची घोषणा केली आहे. देशातील सिमेंट क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण मानले जाते. नवीन परदेशी कर्जाचा काही भाग या संपादनासाठी वापरला जाईल. आतापर्यंत बार्कलेज, डाॅइश बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक अदानी समूहाला संपादनासाठी पूर्णपणे निधी देत आहेत. आता अशा बँकांची संख्या वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...