आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी करणार 1114 दशलक्ष डॉलर्सचे प्री-पेमेंट:तारण शेअर सोडवून घेणार, समूहाने केले निवेदन जारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अडचणीत आलेला अदानी समूह आपल्या समूहाचे तारण समभाग म्हणजेच शेअर्स सोडवण्यासाठी 1114 डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 हजार कोटींचे प्री पेमेंट करणार आहे. हे शेअर्स अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे आहेत. कंपनीने जारी केलेल्या एका विधानात हे म्हटले आहे.

कंपनीचे विधान

हे सर्व शेअर-समर्थित वित्तपोषणाच्या प्री-पेमेंटसाठी प्रमोटर्सच्या आश्वासनाच्या निरंतरतेमध्ये आहे असे कंपनीने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे. कंपनीने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, 'अलिकडील बाजारातील चढ-उतार पाहता अदानींच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सनी समर्थित समग्र प्रमोटर लिव्हरेज कमी करण्यासाठी प्रमोटर्सची कटीबद्धता जारी ठेवत, हे सूचित करताना आम्हाला आनंद होत आहे की प्रमोटर्सनी मॅच्युरिटीपूर्वी 1114 डॉलर्सचे प्री पेमेंट करण्यासाठी रक्कम पोस्ट केली आहे.'

अदानींच्या या कंपन्यांचे शेअर सोडवणार

प्री-पेमेंटवर अदानी पोर्टस अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे 16.82 कोटी शेअर्स, जे प्रमोटर्सच्या 12 टक्के हिस्सेदारीचे प्रतिनिधित्व करतात, सोडवले जातील. अदानी ग्रीनच्या बाबतीत 2.75 कोटी शेअर्स जे प्रमोटर्सच्या 3 टक्के हिस्सेदारीचे प्रतिनिधित्व करतात, सोडवले जातील. सोबतच अदानी ट्रान्समिशनचे 1.17 कोटी शेअर्स जे प्रमोटर्सच्या 1.4 टक्के हिस्सेदारीचे प्रतिनिधित्व करतात, सोडवले जातील.

ही बातमीही वाचा...

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 12 दिवसांत 60% घसरले:कॉंग्रेस म्हणाले- संसदेत अन्य कोणताच मुद्दा नाही, दिल्लीसह 6 राज्यात आंदोलन

बातम्या आणखी आहेत...