आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंडेनबर्ग ही काही धर्मादाय संस्था किंवा मदत करणारी संस्था नाही. मध्यवर्गीय गुंतवणूकदारांचे नुकसान करून पैसे कमावणे हा हिंडेनबर्गचा मुळ उद्देश आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केली. त्यामुळे हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. NDTV ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पुढे बोलताना साळवे म्हणाले की, अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाची सखोल चौकशी व्हायला हवी. ज्याने अदानी समूहाच्या कंपन्यांना लक्ष्य केले आणि बाजारात अस्थिरता आणली. हिंडनबर्ग ही काही धर्मादाय संस्था किंवा सेवाभावी संस्था नाही आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या खर्चावर पैसे कमविणे हाच तिचा उद्देश आहे.
बाजारातील हेराफेरी करणे हाच उद्देश
अदानी ग्रुप-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या 6 सदस्यीय समितीचा संदर्भ देत ते म्हणाले की, या समितीने शेअर्सच्या किमती कमी करून प्रचंड पैसा कमावणाऱ्या सर्वांचा शोध घेतला पाहीजे. याला बाजारातील फेरफार समजा आणि अशा लोकांना व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी तपास करून बंदी घातली जावी.
प्रत्येक अहवाल सेबीकडे गेला पाहिजे
ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले की, आपण आपल्या बाजारपेठेत एक उदाहरण ठेवले पाहिजे की, कोणताही अहवाल असल्यास तो प्रथम सेबी किंवा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे गेला पाहिजे. ते अशा प्रकरणांची चौकशी करून कारवाई करतील. पण जर तुम्ही अशा अहवालांचा वापर करून कंपन्यांवर हल्ला करणार असाल तर सेबी गप्प बसणार नाही. बाजारातील अस्थिरतेचा गैरफायदा घेऊन पैशाच्या जोरावर गुंतवणूक करणाऱ्या मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचे नुकसान करणाऱ्यांवर ते कारवाई करणार आहेत.
हिंडेनबर्गने अदानी ग्रुपवर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप
24 जानेवारीला अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बरीच अस्थिरता दिसून आली आहे. हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांवर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला. मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 16.60% वाढले
शुक्रवारी अदानी समूहाच्या सर्व 10 शेअर्समध्येही तेजी दिसून आली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा सर्वाधिक 16.60% हिस्सा होता. दुसरीकडे, अदानी पोर्ट्समध्ये 9.76% ची वाढ दिसून आली. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, विल्मर, पॉवर, टोटल गॅस, ग्रीन एनर्जी, अंबुजा सिमेंट, एसीसी आणि एनडीटीव्ही यांचे शेअर्स प्रत्येकी 5-5% वाढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.