आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही अदानींचे शेअर्स तेजीत:6 शेअर्समध्ये अपर सर्किट, बँकांचा समूह 6,600 कोटींची क्रेडिट सुविधा देणार

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेन्सेक्स बुधवारी ४४८ अंकांनी वधारत ५९,४११ वर, तर निफ्टी १४६ अंकांच्या तेजीसह १७,४५० वर बंद झाला. अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी तेजी दिसली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर १६% बळकट झाले. अदानी ग्रीन्स, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर, एनडीटीव्ही, अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये ५% तेजी राहिली. यामध्ये अपर सर्किट लागले.

हिंडेनबर्ग अहवालानंतर कंपनीचे शेअर्स गडगडणे सुरू झाले होते. यामुळे सोमवारपर्यंत २४ सत्रांमध्ये समूहाचा मार्केट कॅप १२.१ लाख कोटी रुपयांनी घसरला होता. तथापि, गेल्या दोन दिवसांच्या तेजीत सुमारे १ लाख कोटी रुपयांची रिकव्हरी झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २४ सत्रांमध्ये ६१.८ टक्क्यांनी घसरला होता आणि दोन दिवसांत २८.९ टक्क्यांची रिकव्हरी झाली.

सोमवारी सिंगापूर व मंगळवार-बुधवारी हाँगकाँगमध्ये रोड शो झाला. यादरम्यान, बँकांचा एक समूह अदानी समूहाला ६,६०० कोटी रुपयांची क्रेडिट सुविधा देण्यास तयार झाला आहे. याचा वापर अदानी ग्रीन एनर्जीचे सुमारे ६,१०० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी केला जाऊ शकतो.अदानी ग्रीन एनर्जीचा हा बाँड सप्टेंबर २०२४ मध्ये मॅच्युअर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...