आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Adani Shares Updates: Lower Circuit In All Adani Group Companies, Some Recovered At The End Of The Day; News And Live Updates

मुंबई:अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांमध्ये लोअर सर्किट, दिवसअखेर काही सावरले; समूहाची हिस्सेदारी राखणाऱ्या 3 विदेशी फंडांचे एफपीआय खाते फ्रीझ होण्याचे वृत्त

गोंधळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समूहाकडून चुकीचे वृत्त ठरवल्यावर घसरण कमी, मात्र शेअर सावरले नाहीत

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळच्या व्यवसायात २५% पर्यंत मोठी घसरण आली. समूहाच्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी ठेवणारी तीन एफपीआय खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडद्वारे(एनएसडीएल) गोठवण्याच्या वृत्तानंतर ही घसरण आली. समूहाच्या सर्व सहा कंपन्यांचे शेअर लोअर सर्किटवर खुले झाले. मात्र, अदानी ग्रुपकडून निवेदन आल्यानंतर या तीन विदेशी फंडांचे खाते फ्रीझ केले नाही, समूहाच्या तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण कमी झाली. मात्र, ते नुकसानीतून पूर्णपणे सावरू शकले नाहीत.

व्यवसाय समाप्तीवर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ६.२६%, अदानी पोर्ट्‌स अँड एसईझेड ८.३६%, अदानी पॉवर ४.९९%, अदानी ट्रान्समिशन ५.००%, अदानी ग्रीन एनर्जी ४.१३% आणि अदानी टोटल गॅसचे शेअर ५.००% नुकसानीसह बंद झाले. अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये दिवसभराचा व्यवसाय थांबला. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ८३०%, या वर्षात आतापर्यंत १९६% व जूनच्या महिन्यात १६.२२% वधारले. याच पद्धतीने गेल्या एका वर्षात अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये ६६९%, अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये ३४९% व अदानी ग्रीनच्या शेअरमध्ये २५४% तेजी आली. शुक्रवारी अदानी ग्रुपचे बाजार भांडवल ९.५ लाख कोटी रु. होते. सोमवारी ८.९७ लाख कोटी राहिले.

अदानीचा परिणाम नाही; सेन्सेक्स, निफ्टी नव्या उंचीवर बंद
मुंबई | देशातील शेअर बाजारावर अदानी समूह कंपन्यांच्या शेअरमध्ये आलेल्या घसरणीचा परिणाम झाला नाही. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा कल दिसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७६.७७ अंकाच्या (०.१५%) वाढीसह ५२,५५१.५३ च्या नव्या उंचीवर बंद झाला. एनएसई निफ्टीतही १२.५० अंकाची (०.०८%) वाढ राहिली. हा १५,८११.८५ च्या नव्या उंचीवर बंद झाला. सकाळी बाजार कमकुवत खुला झाला. मात्र, दुपारनंतर बाजारात तेजीवाल्यांची पकड बळकट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस बजाज फायनान्स, एलअँडटी व टीसीएससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी निघाल्याने वाढ दिसली.

अदानीच्या गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
अर्सच्या २५% घसरणीनंतर जोरदार पुनरागमन केले. शेअर थोडे वधारत असतील तर ज्या लोकांनी त्यात पैसे गुंतवले आहेत, त्यांनी नफा वसूल केला पाहिजे. ग्रुपमध्ये समस्या दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संधी पाहिली पाहिजे.

नव्या गुंतवणूकदारांनी अदानी ग्रुपवर लक्ष दिले पाहिजे?
गुंतवणूकदारांकडे चांगल्या शेअर्सची लांब यादी आहे. अशा स्थितीत ज्या कंपन्यांमध्ये समस्या दिसतेय, तिथे पैसा गुंतवणे टाळले पाहिजे. जे गुंतवणूकदार प्रतीक्षा करत होते, त्यांनी थोडी आणखी वाट पाहावी.

अदानी समूहावरील आरोपात किती तथ्य?
काही सांगणे कठीण आहे. मात्र, त्यात प्रश्न उपस्थित होत आहेत. उदा. ज्या फंडाचे खाते फ्रीझ झाले, त्यांनी १००% गुंतवणूक अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये केली आहे. त्यांनी आणखी कोणत्या कंपनीत पैसा गुंतवला आहे?

बातम्या आणखी आहेत...